मेरी कोमला 'वाईल्ड कार्ड' प्रवेशास नकार

पीटीआय
गुरुवार, 23 जून 2016

नवी दिल्ली - पाच वेळा जगज्जेतेपद तसेच ऑलिंपिक ब्रॉंझपदक जिंकलेल्या मेरी कोमला रिओ ऑलिंपिकसाठी वाईल्ड कार्ड प्रवेश देण्यास आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने (आयओए) नकार दिला आहे. 

नवी दिल्ली - पाच वेळा जगज्जेतेपद तसेच ऑलिंपिक ब्रॉंझपदक जिंकलेल्या मेरी कोमला रिओ ऑलिंपिकसाठी वाईल्ड कार्ड प्रवेश देण्यास आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने (आयओए) नकार दिला आहे. 

आयओएच्या नकारामुळे मेरी कोमचे रिओ ऑलिंपिकमध्ये खेळण्याचे स्वप्न भंगले आहे. जागतिक संघटनेने वाईल्ड कार्ड दिल्यासच ऑलिंपिकमध्ये सहभागी होता येणार होते. आयओएने सांगितले, की ऑलिंपिकमध्ये ज्या देशाचे आठपेक्षा जास्त मुष्टियोद्धा सहभागी आहेत. त्या देशातील अन्य खेळाडूला वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश देण्यात येणार नाही. ऑलिंपिकमध्ये भारताचे आठ पेक्षा जास्त सदस्य आहेत. आयओएचा हा निर्णय आम्हाला मान्य करावा लागेल, असे मुष्टियुद्ध हंगामी समितीचे अध्यक्ष किशन नरसी यांनी सांगितले. 

जागतिक स्पर्धेत मेरीला पात्रता संपादन करता आली नाही. कझाकस्तानमधील ऍस्टानामध्ये झालेल्या स्पर्धेत मेरी 51 किलो वजनी गटात जर्मनीच्या अझीझी निमानीकडून दुसऱ्या फेरीत हरली. मेरी 33 वर्षांची आहे. ऑलिंपिक प्रवेशासाठी तिला किमान उपांत्य फेरी गाठणे आवश्‍यक होते.  त्यामुळे तिच्या ऑलिंपिकसाठी थेट पात्र ठरण्याच्या आशा दुरावल्या.