चेन्नईचा धोरणी विजय

सोमवार, 21 मे 2018

पुणे - महेंद्रसिंह धोनी आणि सुरेश रैना फलंदाजी करत असतील तर धावांचे कितीही मोठे आव्हान खडतर नसते, हे आज पुन्हा एकदा सिद्ध झाले. किंग्ज इलेव्हन पंजाबच्या १५४ धावांचे आव्हान चेन्नई सुपर किंग्जने पाच गडी राखून पार केले. पंजाबच्या पराभवामुळे आणि मुंबई इंडियन्स हरल्यामुळे राजस्थान रॉयल्सला ‘प्ले ऑफ’मध्ये स्थान मिळाले.

या लढतीत धोनीच्या धोरणीपणाचा नमुना पाहण्यास मिळाला. आव्हान १५४ धावांचे असले, तरीही चेन्नईला १०० धावांमध्येच रोखले असते, तर पंजाबला ‘प्ले ऑफ’मध्ये दाखल होता आले असते. त्यामुळे डावाच्या सुरवातीलाच पंजाबचा कर्णधार अश्‍विन त्याच्या भात्यातील सर्वोत्तम अस्त्रे वापरणार, हे उघड होते. त्यामुळे डावाच्या चौथ्याच षटकात सॅम बिलिंग्ज बाद झाल्यानंतर त्याने हरभजनसिंगला आणले आणि तो बाद झाल्यावर दीपक चहारला फलंदाजीस पाठविले. यामुळे ॲण्ड्य्रू टाय, अंकित राजपूत या प्रमुख गोलंदाजांची षटके संपल्यानंतर पंजाबला डावाच्या अखेरीस फिरकी गोलंदाजांचाच वापर करावा लागणार, हा धोनीचा अंदाज अचूक ठरला. जम बसविण्यास वेळ घेतल्यानंतर चहारने फिरकी गोलंदाजांवर हल्ला केला. चहारने २० चेंडूंत ३९ धावा केल्या. चहार बाद झाल्यावर रैनाने अखेरच्या षटकांमध्ये ‘टॉप गिअर’ टाकला आणि चेन्नईचा वजय साकारला.

त्यापूर्वी अस्तित्वाच्या या लढाईत ख्रिस गेल, लोकेश राहुल, ॲरॉन फिंच हे आक्रमक झटपट बाद झाल्याने पंजाबच्या आव्हानातील हवाच निघून गेली होती. सहाव्या क्रमांकावर खेळायला आलेल्या करुण नायरच्या फटकेबाजीने पंजाबला किमान दीडशेची मजल मारणे शक्‍य झाले. चेन्नईकडून लुंगी एन्गिडीने चार गडी बाद केले. 

संक्षिप्त धावफलक 

पंजाब १९.४ षटकांत १५३ (करुण नायर ५४, मनोज तिवारी ३५, लुंगी एन्गिडी ४-१०, शार्दुल ठाकूर २-३३, ड्‌वेन ब्राव्हो २-३९) प. वि. चेन्नई १९.१ षटकांत ५ बाद १५९ (सुरेश रैना नाबाद ६१ -४८ चेंडू, ४ चौकार, २ षटकार, दीपक चहर ३९ -३० चेंडू, १ चौकार, ३ षटकार, अंकित रजपूत २-१९, अश्‍विन २-३६)

Web Title: IPL 2018 Chennai Super Kings beat Kings XI Punjab