IPL Media Rights : स्टार स्पोर्ट्सकडेच IPL प्रक्षेपण हक्क

डिजिटल प्रसारण हक्क रियालन्सच्या वॉयकॉमकडे
IPL Media Rights Auction 2022 Updates
IPL Media Rights Auction 2022 Updatessakal

लाखो, करोडो नव्हे तर आता अब्जावधी रुपयांची बोली लागलेल्या आयपीएल प्रक्षेपण हक्क डिसने स्टार अर्थात स्टार स्पोर्टसने स्वतःकडेच राखले त्यासाठी त्यांना पुढील पाच वर्षांसाठी त्याकरिता २३,५७५ कोटी मोजावे लागणार आहे. तर डिजिटल प्रसारण हक्क रियायन्सच्या वायकॉमने २०,५०० कोटींमध्ये मिळवले. एकूण पहिल्या दोन श्रेणीसाठी ४४,०७५ कोटींची बोली पूर्ण झाली.(IPL Media Rights Auction 2022 Updates)

बहुचर्चित आणि सर्वांचे लक्ष लागून राहिलेला आयपीएल लिलावाचा हा सामना अजून अंतिम निर्णयापर्यंत आलेला नसला, तरी दूरचित्रवाणी आणि डिजिटल हक्कांचा लिलाव पूर्ण झाला आहे. क या श्रेणीतील लिलाव अपूर्ण राहिला आहे. उद्या हा अपूर्ण लिलाव आणि ड श्रेणीचा (परदेशातील प्रसारण हक्क) पूर्ण होण्याची शक्यता आहे.

४४,०७५ कोटी

२०२३ ते २०२७ या पाच वर्षांसाठी प्रसारण हक्कांचा लिलाव सुरू आहे. एकूण ४१० सामन्यांसाठी दूरचित्रवाणी हक्क (२३,५७५ कोटी) प्रत्येक सामन्यासाठी (५७.५) आणि डिजिटल हक्क (२०,५०० कोटी) प्रत्येक सामन्यासाठी ५० कोटींना विकले गेले. याची एकत्रित किंमत ४४,०७५ कोटी आणि प्रत्येक सामन्यासाठी १०७.५ कोटी इतकी झाली. ही किंमत जगात दुसऱ्या क्रमांकाची आहे.

क श्रेणी १७ कोटी आणि पुढे...

या दोन श्रेणींनंतर क श्रेणीसाठी लिलाव सुरू झाला याची किंमत प्रत्येक सामन्यासाठी १७ कोटींपर्यंत गेली असल्याचे समजते. त्यामुळे दुसऱ्या दिवसापर्यंत प्रत्येक सामन्यासाठी बीसीसीआयला किमान १२४.५ कोटी मिळणार हे निश्चित झाले आहे.

स्पर्धा तीव्र...

एकीकडे अब्जावधींची उधळण होत असताना पूर्ण झालेल्या अ आणि ब श्रेणीचे विजेते कोण हे बीसीसीआयकडून अधिकृतपणे जाहीर करण्यात आले नसले तरी बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्याने स्टार स्पोर्ट््स आणि वायकॉमने प्रसारण हक्क मिळवल्याचे स्पष्ट केले. त्या अगोदर दिवसभर टिव्ही प्रक्षेपण हक्क सोनी इंडियाने मिळवल्याची जोरदार चर्चा होती, मात्र सायंकाळनंतर चित्र स्पष्ट होत गेले.

आज विक्रम करणार?

अ (दूरचित्रवाणी) ब (डिजिटल) आणि क (ठराविक १८ सामने) यांची एकत्रित प्रसारण हक्कांची आकडेवारी प्रत्येक सामन्यासाठी आतापर्यंत १२४.५ कोटींपर्यंत गेली आहे. यात उद्या आखणी वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या एनएफएलएलमधील प्रत्येक (अमेरिका फुटबॉल लीग) सामन्याच्या सर्व प्रकारांतील प्रक्षेपणाची मिळून किंमत १३३ कोटी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com