IPL Media Rights : स्टारने टिव्ही तर,Viacom18 ने जिंकले डिजिटल राइट्स

IPL
IPL esakal

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच BCCI ने IPL मीडिया राईट्सच्या (Media Rights ) नावांची घोषणा केली आहे. यासाठी तीन मोठ्या कंपन्यांनी 48,390 कोटी रुपयांना 5 वर्षांसाठी आयपीएलचे हक्क विकत घेतले आहेत, असे बीसीसीआयचे सचिव जय शाह (Jay Shah) यांनी सांगितले. आयपीएलच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरही याची पुष्टी करण्यात आली आहे. आयपीएलच्या ट्विटर अकाऊंटवर स्टार स्पोर्ट्स इंडिया, वायकॉम18 आणि टाइम्स इंटरनेटने मीडियाचे हक्क विकत घेतल्याचे सांगण्यात आले आहे. (IPL Media Right News )

इंडियन प्रीमियर लीगच्या 2023 ते 2027 च्या कालावधीतील मीडिया राईट्सच्या सर्व श्रेणींची लिलाव प्रक्रिया पूर्ण झाली आहे. बीसीसीआयने चार गटांमध्ये मीडिया राईट्स विकण्याचा निर्णय घेतला होता. पहिला गट भारतातील टीव्ही मीडिया अधिकारांचा होता आणि यासाठी 23,575 कोटी रुपयांची बोली लावण्यात आली आहे. दुसरा गट ओटीटी प्लॅटफॉर्मवर टेलिकास्ट अधिकारांचा होता आणि त्यासाठी 20,500 कोटी रुपयांची बोली लावण्यात आली होती. तर, तिसरा गट विशेष श्रेणीतील सामन्यासाठी होता ज्यासाठी 3,258 कोटी रुपयांची बोली लागली होती. चौथा गट विदेशी प्रसारण हक्कांसाठी होता ज्यासाठी 1,057 कोटींची बोली लावण्यात आली होती.

वेगवेगळ्या कंपन्यांना मिळाले मीडिया राईट्स
टीव्ही आणि डिजिटल प्रसारणाचे अधिकार वेगवेगळ्या कंपन्यांना देण्यात आले आहेत. Star Sports ने आयपीएलचे टीव्ही आणि Viacom18 ने डिजिटल राइट्स जिंकले आहेत. तर, Viacom18 ने स्पेशल कॅटेगरी राइट्स आणि Viacom18 आणि Times Internet ने परदेशी मीडिया अधिकार विकत घेतले आहेत.

कसे आहेत पॅकेज

  • पॅकेज A : 23,575 कोटी, प्रति सामना 57.5 कोटी (Star)

  • पॅकेज B : 20,500 कोटी, प्रति सामना 50 कोटी (Viacom)

  • पॅकेज C : 3,258 कोटी, 33.24 कोटी प्रति सामना (Viacom)

  • पॅकेज D : 1,057 कोटी, प्रति सामना 2.6 कोटी (Viacom आणि Times)

बीसीसीआय सचिव जय शाहांचे ट्वीट

मीडिया राईट्सच्या नावांच्या घोषणेनंतर बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ट्वीट केले आहे. यामध्ये त्यांनी स्टार इंडियाने 23,575 कोटी रुपयांच्या बोलीवर आयपीएलचे टीव्ही हक्क विकत घेतल्याची घोषणा करताना मला आनंद होत असल्याचे म्हटले आहे. या लिलावानंतर आयपीएल जगातील दुसरी सर्वात महागडी लीग झाल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com