IPL 2022 Final: गिलला शुन्यावर जीवदान चहलने सोपा झेल सोडला

गुजरात टायटन्सच्या शुभमन गिलला डावाच्या चौथ्या चेंडूवर जीवदान मिळालं.
yuzvendra chahal drop catch shubman gill
yuzvendra chahal drop catch shubman gillsakal

Yuzvendra Chahal Drop Catch Shubman Gill: अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या अंतिम सामन्यात राजस्थान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्याचा हा निर्णय योग्य ठरला नाही. संघाला 20 षटकांत नऊ गडी गमावून केवळ 130 धावा करता आल्या. राजस्थानकडून जोस बटलरने सर्वाधिक 39 धावा केल्या. राजस्थान रॉयल्सने गुजरात टायटन्ससमोर विजयासाठी 131 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

yuzvendra chahal drop catch shubman gill
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची मैदानावर सहकुटुंब हजेरी

जेव्हा पण कोणता संघ कमी धावा करतो त्यावेळीस गोलंदाज आणि क्षेत्ररक्षनाची पातळी चांगली कामगिरी करण्याची अपेक्षा केली जाते. पण राजस्थान रॉयल्सचा लेगस्पिनर युजवेंद्र चहलने पहिल्याच षटकात एक मोठी चूक केली. ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर गुजरातचा सलामीवीर शुभमन गिल स्क्वेअर लेगच्या दिशेने शॉर्ट खेळला. पण चेंडू युझवेंद्र चहलकडे गेला आणि त्याने झेल सोडला.

गिलचा झेल सोडणे राजस्थानला महागात पडू शकते. प्रसिद्ध कृष्णाने वृद्धीमान साहाला 5 धावांवर बाद करत पहिला धक्का दिला. त्याने ट्रेंट बोल्टने मॅथ्यू वेडला 8 धावांवर पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. पण गिल फिरकी उत्तम फलंदाज आहे आहे, त्यामुळे राजस्थानच्या अडचणीत आणखी वाढ होऊ शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com