विश्‍वकरंडकासाठी इराण डेरेदाखल 

वृत्तसंस्था
गुरुवार, 7 जून 2018

विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेसाठी इराण संघ सर्वप्रथम रशियात डेरेदाखल झाला आहे. मंगळवारी संध्याकाळी इराणचा संघ मॉस्को विमानतळावर उतरला, तेव्हा त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. 
 

मॉस्को - विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेसाठी इराण संघ सर्वप्रथम रशियात डेरेदाखल झाला आहे. मंगळवारी संध्याकाळी इराणचा संघ मॉस्को विमानतळावर उतरला, तेव्हा त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. 

इराण संघाचे प्रशिक्षक कार्लोस क्वीरोझ म्हणाले, ""रशियात विश्‍वकरंडक खेळण्याचे आमचे स्वप्न होते. कठोर मेहनत आणि त्याग करून आमचे स्वप्न साकार केले आहे. विश्‍वकरंडकासाठी म्हणून रशियात आल्याचे आम्हालाच अभिमानास्पद वाटत आहे. आम्ही सर्वोत्तम संघ दिला असून, चांगली कामगिरी करुन दाखवू. विश्‍वकरंडक खेळण्याचे स्वप्न साकार झाले असले, तरी स्पर्धेत आमच्या या स्वप्नाला यशाची किनार मिळावी यासाठी प्रत्येक खेळाडू सर्वस्व पणाला लावून खेळ करतील. सर्व खेळाडू शंभर टक्के तंदुरुस्त असून, स्पर्धेत खेळण्यास उत्सुक आहेत.'' 

कार्लोस यांनी या वेळी रशिया स्पर्धा संयोजकांचे आभार मानले आणि स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक संघाला शुभेच्छाही दिल्या. इराण पाचव्यांदा विश्‍वकरंडक स्पर्धेत खेळत असून, त्यांचा पहिला सामना 15 जून रोजी सेंट पीटर्सबर्ग येथे मोरोक्कोशी होणार आहे. 

Web Title: Iran become the first team to arrive in Russia