IPL Media Rights : बक्कळ पैसा कमावल्यानंतर जय शहा काय म्हणाले?

Jay Shah Statement After IPL Media Rights Generate 48390 Crore Revenue
Jay Shah Statement After IPL Media Rights Generate 48390 Crore Revenue ESAKAL

मुंबई : आयपीएलच्या 2023 ते 2027 पर्यंतच्या मीडिया राईट्सचा ई लिलाव नुकताच पार पडला. या लिलावात बीसीसीआयने मीडिया राईट्सचे चार भाग केले होते. या चारही भागांचे मिळून तब्बल 48 हजार 390 कोटी रूपये बीसीसीआयला मिळाले आहेत. बीसीसीआयने आयपीएल मीडिया राईट्समध्ये बक्कळ पैसा कमावल्यानंतर बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी ट्विटवरून प्रतिक्रिया दिली. (Jay Shah Statement After IPL Media Rights Generate 48390 Crore Revenue)

Jay Shah Statement After IPL Media Rights Generate 48390 Crore Revenue
IND vs SA Live : ऋतुराजची बॅट तळपली; किशन सोबत अर्धशतकी सलामी

जय शहा यांनी पाठोपाठ ट्विट करत आयपीएल मीडिया राईट्स कोणाला मिळाले याची माहिती दिली. त्यांनी 'मला स्टार इंडियाने आयपीएलचे टीव्ही प्रक्षेपणाचे हक्क 23 575 कोटी रूपये खर्चून आपल्याकडे कायम ठेवल्याची घोषणा करताना आनंद होत आहे. जेव्हापासून आयपीएल सुरू झाले आहे भारतीय क्रिकेटचा विकास होत आहे. आजचा दिवस भारतीय क्रिकेटसाठी सुवर्णाक्षरांनी नोंदवावा असा आहे. इ लिलावात नवे उच्चांक गाठले गेले आहेत. आता आयपीएलचे मुल्य 48 हजार 390 कोटी इतके झाले आहे. आयपीएल आता जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात श्रीमंत लीग ठरली आहे.'

जय शहा पुढे म्हणाले की, 'आता आमच्या राज्य संघटना, आयपीएल फ्रेंचायजी यांना एकत्र काम करून आयपीएलच्या चाहत्यांना एक सुखद अनुभूती देण्याची गरज आहे. क्रिकेट रसिक हे आपले सर्वात मोठे भागधारक आहेत. त्यांच्या मनोरंजनाची आणि उच्च दर्जाचे क्रिकेट त्यांच्यापर्यंत पोहचवण्याची जबाबदारी आपली आहे.'

Jay Shah Statement After IPL Media Rights Generate 48390 Crore Revenue
रूट सचिनचे वर्ल्ड रेकॉर्ड मोडण्याबाबत गावसकर काय म्हणाले?

जय शहा यांनी सांगितले की मिळालेला हा मोठा महसूल देशांतर्गत क्रिकेट, पायाबूत सोयी सुविधा यांच्यासाठी खर्च करणार आहे. याचबरोबर त्यांनी व्हायकॉम 18 यांनी आयपीएलचे डिजीटल स्ट्रिमिंगचे हक्क 23 हजार 758 कोटी रूपयांना विकत घेतल्याचेही जाहीर केले. यामुळे आता क्रिकेट पाहण्याची पद्धत बदलत असल्याचे पहावयास मिळत आहे. यामुळे खेळाबरोबरच डिजीटल इंडियाचे स्वप्न देखील पूर्ण होण्यास मदत होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com