थॉमस कपचा गाजावाजा मात्र कर्णबधीर बॅडमिंटनपटू अनिकानेही रचला इतिहास

jerlin anika inspiring story
jerlin anika inspiring story ESAKAL

नवी दिल्ली : भारताने पहिल्यांदाच बॅडमिंटनचा थॉमस कप जिंकात इतिहास रचला. याचा गाजावाजा सुरू असतानाच तिकडे ब्राझीलमध्ये 24 वी कर्णबधीर ऑलिम्पिक स्पर्धा (Deaflympics) पार पडली होती. या स्पर्धेत भारताची कर्णबधीर बॅडमिंटनपटू (Badminton Player) जरलीन अनिकाने इतिहास रचला. तिने यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये 3 सुवर्णपदकांची कमाई केली. थॉमस कपचे दैदिप्यमान यश मिळवण्यापूर्वी मदुराईच्या 18 वर्षाच्या अनिकाने ही ऐतिहासिक कामगिरी केली. अनिकाने महिला एकेरी, मिश्र दुहेरी आणि मिश्र सांघिक प्रकारात सुवर्ण कामगिरी केली.

jerlin anika inspiring story
पाकव्याप्त काश्मीरमधील लीग खेळण्यासाठी विराट कोहलीला निमंत्रण?

अनिकाचे वडील जे जेयर रेचागेन यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले की, 'अनिका महिला दुहेरीमध्ये देखील जिंकू शकली असती. मात्र या प्रकारात पराभूत झाल्याचे तिला दुःख आहे. तिला हार आवडत नाही. ज्यावेळी आम्ही ब्राझीलवरून परतत होतो त्यावेळी तिने मला विचारले की लोक माझे अभिनंदन का करत आहेत. मी सर्व चार सुवर्णपदके जिंकू शकले नाही.'

अनिकासाठी हा प्रवास सोपा नव्हता. ज्यावेळी ती बोलू शकत नाही हे कळाल्यानंतर तिच्या वडिलांनी तिला इतर सामन्य मुलांसारखेच वाढवण्याचा निर्णय घेतला. तिची बॅटमिंटनमधील रूची पाहून तिच्या वडिलांनी तिला स्थानिक क्लबमध्ये पाठवले. तिने तिथे आपल्या मित्रांबरोबर बॅडमिंटन खेळण्यास सुरूवात केली.

jerlin anika inspiring story
निखात झरीन नावाचं वादळ पोहचलं वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये

अनिकाच्या वडिलांनी सांगितले की, तिने कोच पी सरवनन यांच्या मार्गदर्शनाखाली मुराईमध्ये 8 वर्षापासून खेळण्यास सुरूवात केली. ते देखील सामान्य मुलांसोबतच तिचा सराव घेत होते. मात्र त्यानंतर त्यांनी अनिकाशी संवाद साधण्यासाठी तिची भाषा शिकली. अनिकाच्या वडिलांना मदुराईच्या एखा जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्याकडून कर्णबधीर ऑलिम्पिकची माहिती मिळाली. अनिकाने 2017 मध्ये टर्कीमध्ये झालेल्या कर्णबधीर ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला. त्यानंतर मलेशियामध्ये झालेल्या एशिया पॅसिफिक बॅडमिंटन स्पर्धेत 2018 ला दोन रौप्य आणि एक कांस्य पदक पटकावले होते. त्यानंतर एका वर्षाने चीनमध्ये जागतिक कर्णबधीर बॅडमिंटन स्पर्धेत एक सुवर्ण आणि दोन रौप्य आणि एक कांस्य पदक पटकावले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com