मुंबईच्या विजयानंतर बटलरचा 'न्यूड' डान्स

वृत्तसंस्था
सोमवार, 22 मे 2017

बटलरने मुंबई इंडियन्ससाठी सलामीवीराची भूमिका पार पाडली होती. त्याच्या स्फोटक खेळीमुळे मुंबईने विजय मिळविले होते. याच विजयाचा आनंदोत्सव साजरा करताना त्याला आपण न्यूड डान्स करत असल्याचेही भान राहिले नाही. 

लंडन - मुंबई इंडियन्सने रायझिंग पुणे सुपर जायंट्स संघावर अखेरच्या चेंडूवर विजय मिळविला आणि तिकडे इंग्लंडमध्ये मुंबईकडून खेळलेल्या जोस बटलर चक्क टिव्हीसमोर न्यूड डान्स केला.

आयपीएलच्या दहाव्या मोसमातील अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्स पुणे संघाचा अवघ्या एक धावेने पराभव करत तिसऱ्यांदा विजेतेपद मिळविले. इंग्लंडचा खेळाडू जोस बटलर हा याच संघाचा सदस्य होता. चँपियन्स करंडकात सहभागी होण्यासाठी त्याला आयपीएल स्पर्धा अर्ध्यावर सोडून जावे लागले. मुंबईच्या संघाने अखेरच्या चेंडूवर विजय मिळविल्यानंतर बटलरने न्यूड डान्स केला. त्याने याचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर अपलोड केला आहे.