बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा "साई'ची कार्यकारी सदस्य

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 मार्च 2017

नवी दिल्ली - भारताची दुहेरीतील यशस्वी बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा हिची क्रीडा प्राधिकरणाच्या (साई) कार्यकारी सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.

नवी दिल्ली - भारताची दुहेरीतील यशस्वी बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा हिची क्रीडा प्राधिकरणाच्या (साई) कार्यकारी सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.

या निवडीनंतर समाधान व्यक्त करताना 14 वेळा दुहेरीत राष्ट्रीय विजेती असलेली ज्वाला म्हणाली, ""नव्या जबाबदारीने मला कर्तव्याची जाणीव झाली आहे. देशात खेळाचा विकास करण्यासाठी मी प्रयत्न करेन. खेळासाठी वेगळे काही तरी योगदान देण्याचे मला आधीपासूनच वाटत होते. आता ते देण्याची संधी मिळाली आहे.''

"साई'चे सचिव एस. एस. छाब्रा यांनी ज्वालाला नियुक्तीचे पत्र दिले. "साई'च्या बैठकाचे आयोजन केले जाईल तेव्हा तुम्ही वेळ द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो, असे छाब्रा यांनी तिला दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
जागतिक स्पर्धेतील ब्रॉंझपदक विजेती ज्वाला म्हणाली, 'मला अजून माझ्या कामाचे स्वरूप कळालेले नाही. पण, मी नेमून दिलेल्या जबाबदारीला बांधील आहे. "साई'च्या 28 मार्च रोजी होणाऱ्या पहिल्या बैठकीस मी नक्कीच उपस्थित राहीन.'' ज्वालाने 2010 दिल्ली राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण आणि 2014 ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक मिळविले आहे.