अभिज्ञा पाटीलला दोन सुवर्णपदके

अभिज्ञा पाटीलला दोन सुवर्णपदके

कोल्हापूर - नाशिक येथे झालेल्या भीष्मराज बाम मेमोरियल महाराष्ट्र वेपन नेमबाजी स्पर्धेत पेठवडगाव (ता. हातकणंगले) येथील अभिज्ञा अशोक पाटील हिने सलग दोन सुवर्णपदके पटकाविली. तिने १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात ६०० पैकी ५६६ गुणांची कमाई करत यश मिळवले.

नाशिक जिल्हा नेमबाजी संघटनेतर्फे स्पर्धा झाली. ती जिल्हा क्रीडा प्रबोधिनी, कोल्हापूरची अनिवासी आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू आहे. ती सध्या पुणे (बालेवाडी) येथे नेमबाजीचा सराव करत आहे. तिला प्रबोधिनीचे प्राचार्य चंद्रकांत साखरे, आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू राही सरनोबत, संदीप तरटे, सय्यद तौसिफ, अजित पाटील, जितेंद्र विभूते, युवराज साळोखे यांचे मार्गदर्शन, तर विकास पाटील, बी. के. चव्हाण, उपसरपंच एम. के. चव्हाण यांचे प्रोत्साहन मिळाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com