लिव्हरपूलचा धडाका, रोमाचा इशारा

वृत्तसंस्था
गुरुवार, 26 एप्रिल 2018

ॲनफिल्ड - मोहंमद सालाहच्या जबरदस्त कामगिरीच्या जोरावर लिव्हरपूलने चॅम्पियन्स लीग फुटबॉल  स्पर्धेतील रोमाविरुद्धच्या लढतीची सूत्रे आपल्या हाती घेतली. लिव्हरपूलने पहिल्या टप्प्याची ही लढत ५-२ जिंकली असली, तरी रोमाने अखेरच्या दहा मिनिटांत दोन गोल करीत प्रतिकाराच्या आशा कायम ठेवल्या. 

गतमोसमात रोमाकडून खेळलेल्या सालाहने मोसमात आत्तापर्यंत ४३ गोल केले आहेत. रोमाविरुद्ध त्याने दोन गोल केले, तसेच अन्य दोन गोलांत निर्णायक कामगिरी बजावली. त्यामुळे लिव्हरपूलने ६८ मिनिटांतच ५-० आघाडी घेतली. या भक्कम आघाडीमुळे लिव्हरपूलने सालाहला ब्रेक देण्याचे ठरवले. रोमाने त्याचा फायदा घेत दोन गोलनी पिछाडी कमी केली. 

लिव्हरपूल चाहत्यांसाठी हे दोन गोल त्रासदायक आहेत. गतवर्षी ते बार्सिलोनाविरुद्ध पहिल्या टप्प्यात १-४ पराजित झाले, पण त्यांनी घरच्या मैदानावर ३-० बाजी मारली आणि सरस अवे गोलमुळे आगेकूच केली. आता गतवर्षीप्रमाणेच परतीच्या लढतीत ३-० विजय मिळविला, तर रोमा आगेकूच करतील.  लिव्हरपूलसाठी हे कमीच होते म्हणून की काय, काही वेळापूर्वी मध्यरक्षक ॲलेक्‍स ऑक्‍सलेड याला स्ट्रेचरवरून न्यावे लागले होते. त्याची दुखापत गंभीर आहे. 

रोमाने आपल्या माजी खेळाडूकडे लक्ष ठेवले होते, पण त्यांची व्यूहरचना विफल ठरली. सालाहने  लिव्हरपूलकडून ४८ लढतीत ४३ गोल केले आहेत. लिव्हरपूलने त्याला ३ कोटी ४० लाख पौंड देऊन खरेदी केले होते. त्याने गेल्या सात सामन्यांत गोल केले आहेत व त्यातही मॅंचेस्टर सिटीविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीच्या दोन्ही लढतींत गोल केले. रोमाचे सुरुवातीचे वर्चस्व मोडण्यातही त्याने मोलाची कामगिरी बजावली होती.

Web Title: Liverpool strikes