लोढा समितीला नऊनंतर भेटण्याची तयारी - ठाकूर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली - लोढा समितीच्या सदस्यांना नऊ नोव्हेंबरनंतर कोणत्याही दिवशी भेटण्यास तयार असल्याचे बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी पत्राद्वारे समितीला कळविले आहे.

दरम्यान, शनिवारी ठाकूर यांनी शनिवारी समितीला अहवाल सादर केला. त्यांनी प्रतिज्ञापत्रात लिहिले आहे, की संसदेचे पावसाळी अधिवेशन लांबल्यामुळे यापूर्वी उपस्थित राहू शकलो नाही. याबद्दल दिलगीर आहे; पण बुधवारनंतर केव्हाही भेटेन.

ऑगस्ट महिन्यात मंडळाचे चिटणीस अजय शिर्के समितीसमोर उपस्थित राहिले होते. आता ठाकूर आणि शिर्के हे दोघे समितीच्या सदस्यांची भेट घेऊन अहवालाच्या अंमलबजावणीविषयी चर्चा करण्याची अपेक्षा आहे. ठाकूर यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १९ पानी अहवाल सादर केला आहे. त्यांनी म्हटले आहे, की शिफारशींची संपूर्ण अंमलबजावणी करण्यात व्यवहार्य अडचणी आहेत. मी तसेच सचिव शिर्के यांना मतच नाही. त्यामुळे आम्ही अंमलबजावणीची सक्ती संलग्न सदस्यांवर करू शकत नाही. वार्षिक निधी गोठवला तरी सदस्यांना रोखता येणे शक्‍य नाही. याचे कारण बीसीसीआयची तमिळनाडू संस्था नोंदणी कायद्याच्या अंतर्गत नोंदणी झाली आहे.

Web Title: Lodha Committee meeting