महाराष्ट्राचा सलग चौथा विजय

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 मार्च 2017

कटक - विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्राने उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश जवळपास निश्‍चित केला. महाराष्ट्राने बलाढ्य तमिळनाडूला २२ धावांनी हरवून सलग चौथा विजय नोंदविला. सलामीवीर ऋतुराज गायकवाडची ८२ धावांची खेळी आणि श्रीकांत मुंढेच्या चार विकेटमुळे महाराष्ट्राची घोडदौड कायम राहिली.

कटक - विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्राने उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश जवळपास निश्‍चित केला. महाराष्ट्राने बलाढ्य तमिळनाडूला २२ धावांनी हरवून सलग चौथा विजय नोंदविला. सलामीवीर ऋतुराज गायकवाडची ८२ धावांची खेळी आणि श्रीकांत मुंढेच्या चार विकेटमुळे महाराष्ट्राची घोडदौड कायम राहिली.

धनेश्‍वर रथ संस्थेच्या मैदानावर महाराष्ट्राचा कर्णधार केदार जाधवने नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतली. सात चेंडू बाकी असताना महाराष्ट्राचा डाव २७० धावांत संपला. प्रत्युत्तरादाखल तमिळनाडूचा डाव पाच चेंडू उरले असताना २४८ धावांत आटोपला. सात संघांच्या गटात महाराष्ट्र १६ गुणांसह आघाडीवर आहे. त्रिपुरा तिन्ही सामने जिंकून १२ गुणांसह दुसरा आहे. तमिळनाडूची तिसऱ्या क्रमांकावर घसरण झाली. चार सामन्यांत त्यांना पहिलाच पराभव पत्करावा लागला. त्रिपुराप्रमाणे १२ गुण असले तरी त्यांचा नेट रन रेट कमी आहे. महाराष्ट्राची यानंतर शुक्रवारी उत्तर प्रदेश; तर शनिवारी त्रिपुराशी लढत होईल.

महाराष्ट्राने फलंदाजीतील सातत्य कायम राखले. ऋतुराज आणि फॉर्म गवसलेल्या झोल यांनी ६६ धावांची सलामी दिली. झोल व बावणे पाठोपाठच्या षटकात बाद झाले. त्यानंतर केदार, नौशाद शेख व निखिल नाईक यांनी उपयुक्त भर घातली.

तमिळनाडूने १ बाद १०२ अशी वाटचाल केली होती; पण कर्णधार केदारने गोलंदाजीत सातत्याने बदल केले. क्षेत्ररक्षकांनी त्याला चांगली साथ दिली. अनुभवी दिनेश कार्तिकला धुमाळने पायचीत केले. सर्वाधिक ४९ धावा केलेल्या बाबा इंद्रजीतचा अडथळा काझीने दूर केला.

संक्षिप्त धावफलक
महाराष्ट्र ः ४८.५ षटकांत सर्वबाद २७० (ऋतुराज गायकवाड ८२-७६ चेंडू, ९ चौकार, २ षटकार, विजय झोल १८, केदार जाधव २६-३० चेंडू, २ चौकार, १ षटकार, नौशाद शेख ६८-६६ चेंडू, ३ चौकार, ३ षटकार, निखिल नाईक २३-२३ चेंडू, ३ चौकार, १ षटकार, ए. अश्‍विन क्रिस्त २-७०, एम. महंमद २-३६, राहील शहा २-५३) विवि तमिळनाडू ः ४९.१ षटकांत सर्वबाद २४८ (कौशिक गांधी ३८, व्ही. गंगा श्रीधर राजू ३७, बाबा अपराजित २६, दिनेश कार्तिक ९, बाबा इंद्रजित ४९, प्रदीप दाढे १०-०६५-१, निकीत धुमाळ १०-०-३८-२, शमशुझ्मा काझी १०-०-५५-२, जगदीश झोपे १०-०४४-१, श्रीकांत मुंढे ९.१-४३-४)

Web Title: Maharashtra fourth victory