Maharashtra's team announcement for the National Athletics Championship
Maharashtra's team announcement for the National Athletics Championship

राष्ट्रीय ऍथलेटिक्‍स स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघाची घोषणा 

नागपूर - गुवाहाटी येथे 26 जूनपासून होणाऱ्या 58 व्या सिनिअर राष्ट्रीय आंतर राज्य ऍथलेटिक्‍स स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा 41 सदस्यीय संघ जाहीर करण्यात आला. त्यात 25 महिलांचा समावेश आहे. नाशिक येथे झालेल्या राज्य स्पर्धेत पात्रता निकष पार करणाऱ्या खेळाडूंची यात निवड करण्यात आली. त्याचप्रमाणे राष्ट्रीय शिबिरात असणाऱ्या खेळाडूंचीही विनंतीवरून निवड करण्यात आली. संघात सिद्धांत थिंगलीया, कालिदास हिरवे, अविनाश साबळे, निधी सिंग, अर्चना आढाव आणि स्वाती गाढवे यांचा समावेश आहे. 

गुवाहाटी येथील स्पर्धा जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी शेवटची चाचणी स्पर्धा आहे. राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी उत्तम कामगिरी करावी व भारतीय संघात स्थान मिळवावे, या उद्देशाने होमियार मिस्त्री, अभय मळेकर, गुरबन्स कौर, संध्या मांडरेकर यांच्या निवड समितीने खेळाडूंची निवड केली. 

महाराष्ट्र संघ ः (पुरुष) ः सचिन पाटील, राहुल एैर, कृष्णकुमार राणे, जयकुमार गावडे, अनिरुद्ध गुजर, रणजित, पारस पाटील, अभिषेक उभे, प्रतीक निनावे, शहबाज खान, सर्वेश अनिल, अविनाश साबळे, सिद्धांत थिंगलिया, मिराज अली, कालिदास हिरवे, विक्रांत रैनक. 
(महिला) ः संजीवनी जाधव, मोनिका अठारे, आरती पाटील, सोनिया शिंदे, डिआंड्रा वॅल्लाडरेस, चैत्राली गुजर, रश्‍मी शेरेगर, वैष्णवी यादव, निकिता राऊत, समीक्षा उपरीकर, शीतल पिंजरे, जुईली बधे, वर्षा भावरी, कोमल जगदाळे, ज्योती चौहान, रिशू सिंग, सोनल देसाई, रोसलीन लेवीस, साक्षी पागनीस, अंकिता गोसावी, संतोषी देशमुख, सुरभी वेदपाठक, निधी सिंग, अर्चना अढाव, स्वाती गाढवे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com