धोनी झाला सीईओ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 एप्रिल 2017

मुंबई - भारतीय क्रिकेट संघाच्या सर्वांत यशस्वी कर्णधारात गणना होणारा महेंद्रसिंह धोनी याने गल्फ ऑईल इंडियाचा सीईओ म्हणून सूत्रे स्वीकारली; मात्र ही सूत्रे केवळ एका दिवसासाठीच होती. आयपीएल काही दिवसांवर आलेली असताना धोनीच्या या स्पर्धेतील संभाव्य कामगिरीची, त्याला पुण्याने कर्णधार पदावरून दूर केल्याची जास्त चर्चा होती. आज त्याने ही सूत्रे हाती घेतल्याचे पाहून कंपनीतील अनेकांना धक्का बसला. त्याने ही सूत्रे मुंबईतील मुख्यालयात स्वीकारली असल्याचे समजते. निळा सूट, पांढरा शर्ट आणि टाय परिधान केलेला धोनी कॉर्पोरेटस्‌च्या वेषातच कंपनीत आला होता. धोनी आणि गल्फ ऑईलचे नाते जुने आहे. तो या कंपनीचा 2011 मध्ये ब्रॅण्ड ऍम्बेसिडर झाला होता. कंपनीने धोनीला एका दिवसासाठी सीईओ होण्याची विनंती केली. भारताच्या माजी कर्णधाराने ती लगेचच स्वीकारली.