मनिका बात्राला सुवर्णपदक

वृत्तसंस्था
रविवार, 15 एप्रिल 2018

आदल्या दिवशी महिलांच्या दुहेरीत रौप्यपदक जिंकल्यानंतर भारताची अव्वल टेबल टेनिस खेळाडू मनिका बात्राने आज महिलांच्या एकेरीत पदकाचा रंग सोनेरी केला. राष्ट्रकुल स्पर्धेत टेबल टेनिसमध्ये भारताची पताका उंच झळकाविणारी मनिका एकेरीत सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली. अंतिम सामन्यात मनिकाने सिंगापूरच्या मेन्गेयू यू हिचा ४-० (११-७, ११-६, ११-२, ११-७) असा पराभव केला.

मनिकाचेही या राष्ट्रकुल स्पर्धेतले तिसरे पदक आहे. तिने सांघिक विभागातही सुवर्णपदक जिंकलेले आहे. २०११ पासून मनिकाने टेबल टेनिसमध्ये खऱ्या अर्थाने कारकिर्दीस सुरवात केली. वयाच्या २१ व्या वर्षी तिने चिली ओपन स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते. २०१४ च्या ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेतही तिने देशाचे प्रतिनिधित्व केले होते, परंतु उपांत्यपूर्व फेरीतपर्यंतच मजल मारता आली होती. या अपयशानंतर उसळी घेणाऱ्या मनिकाने २०१५ मधील राष्ट्रकुल टेबल टेनिसमध्ये तीन पदकांची कमाई केली. दक्षिण आशियाई वयोगटातील स्पर्धा जिंकून मनिका रिओ ऑलिंपकसाठी पात्र ठरली होती, परंतु पहिल्याच फेरीत तिचा पराभव झाला होता.

Web Title: Manika Batra Gold Medal Commonwealth Games india table tennis