दत्तू भोकनळ,संजीवनी जाधवच्या कामगिरीकडे लक्ष 

residentional photo
residentional photo


नाशिक : जाकार्ता(इंडोनेशिया) येथे आजपासून सुरु झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत नाशिककर दत्तू भोकनळ हा रोईंगमध्ये(क्वाडर पल प्रकार) लष्करातून भारताचे प्रतिनिधीत्व करीत आहे. तर धावपटू संजीवनी जाधव हि पाच व दहाहजार किलोमिटरसाठी भारतीय संघात आहे. दत्तूच्या रोईंग प्रकारातील मुख्य स्पर्धा उद्या(ता.19) पासून सुरु होत आहे. त्यामुळे ऑलिंम्पिक स्पर्धेतील सहभागानंतर आत्मविश्‍वास उंचावलेल्या दत्तूकडून पदक जिंकण्याची क्रीडाप्रेमींना अपेक्षा आहे. 

दत्तू रोईंगमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. आशियाई स्पर्धेत निवडीवेळी त्याने सर्व राष्ट्रीय रोईंगपटूंवर मात करत आपली पात्रता सिद्ध केली आहे. तसेच परदेशी प्रशिक्षकांकडे सराव करतांना आपल्या कामगिरीतही भरपुर सुधारणा केल्या आहेत. यापूर्वी 2015 च्या आशियाई स्पर्धेत दत्तूने द्वितीय क्रमांकासह रौप्यपदक पटकावले होते. ऑलिंम्पिक स्पर्धेत दत्तूने करडी टक्‍कर दिली होती.

नंतरच्या कालावधीत निकोल गिओगा यांच्याकडे प्रशिक्षण घेतांना त्याने कसून सराव केला. सरावादरम्यान दत्तूने 7.02 मिनीटे अशी वेळ नोंदविली आहे. यापूर्वी 2014 मधील आशियाई स्पर्धेतील इराणच्या सूवर्णपदक विजेत्या मोहसिन सौदी (7.05 मिनीटे) याच्या वेळेपेक्षा ही किफायतशिर अशीच असल्याचे प्रशिक्षकांचे म्हणणे आहे. दरम्यान सुवर्णपदकाचा दावेदार दत्तूपुढे इंडोनेशीयातील वातावरणाचे आव्हान असेल, असेही त्याच्या प्रशिक्षकांचे म्हणणे आहे. 

आशियाई स्पर्धेत दत्तू क्‍वाडरपल या गटातून भारताचे प्रतिनिधीत्व करीत आहे. त्याच्यासोबत संघात ऑलिंम्पिकपटू सवरण सिंग, ओम प्रकाश आणि सुमीत सिंग यांचा समावेश आहे. दरम्यान दत्तूसह खेळाडू इंडोनेशियाकरीता रवाना झालेले आहेत. 

संजीवनी जाधवकडूनही पदकाची अपेक्षा 
यापूर्वी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचा तिरंगा फडकविणारी नाशिकची धावपटू संजीवनी जाधव हीदेखील जकार्ता येथे होत असलेल्या आशियाई स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे. सध्या संजीवनी शिंपू (भूतान) येथे प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिरात प्रशिक्षण घेते. मंगळवारी (ता.21) संजीवनी जकार्तासाठी रवाना होणार आहे. आशियाई स्पर्धेत पाच हजार मीटर व दहा हजार मीटर गटातून ती सहभागी होईल. यापूर्वी गेल्यावर्षीच्या आशियाई इंडडोअर स्पर्धेत तीन हजार मीटर गटातून संजीवनीने रौप्यपदकाची कमाई केली होती. त्यामूळे यंदाही तिच्याकडून पदकाची अपेक्षा आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com