मंत्रालयाची आयओएला आजपर्यंत मुदत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 डिसेंबर 2016

वादग्रस्त नियुक्तीबद्दल ‘आयओए’ अध्यक्ष जबाबदार - विजय गोयल

मुंबई - भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या सुरेश कलमाडी आणि अभयसिंह चौटाला यांच्या नियुक्तीप्रकरणी बजावलेल्या कारणे दाखवा नोटिशीला उत्तर देण्यासाठी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने भारतीय ऑलिंपिक संघटनेला (आयओए) शुक्रवारी सायंकाळी पाचपर्यंत मुदत दिली आहे. ‘आयओए’च्या सभेत विषयपत्रिकेवरच नसलेला विषय घेतल्याबद्दल आणि तो मंजूर केल्याबद्दल अध्यक्ष एन. रामचंद्रन हेसुद्धा तितकेच जबाबदार आहेत, असे परखड प्रतिपादन केंद्रीय क्रीडा मंत्री विजय गोयल यांनी केले.

वादग्रस्त नियुक्तीबद्दल ‘आयओए’ अध्यक्ष जबाबदार - विजय गोयल

मुंबई - भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या सुरेश कलमाडी आणि अभयसिंह चौटाला यांच्या नियुक्तीप्रकरणी बजावलेल्या कारणे दाखवा नोटिशीला उत्तर देण्यासाठी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने भारतीय ऑलिंपिक संघटनेला (आयओए) शुक्रवारी सायंकाळी पाचपर्यंत मुदत दिली आहे. ‘आयओए’च्या सभेत विषयपत्रिकेवरच नसलेला विषय घेतल्याबद्दल आणि तो मंजूर केल्याबद्दल अध्यक्ष एन. रामचंद्रन हेसुद्धा तितकेच जबाबदार आहेत, असे परखड प्रतिपादन केंद्रीय क्रीडा मंत्री विजय गोयल यांनी केले.

येथील आरसीएफ मैदानावर दहाव्या राष्ट्रीय वनवासी तिरंदाजी स्पर्धेचे उद्‌घाटन त्यांनी केले. त्या वेळी त्यांनी पत्रकारांना सांगितले की, ‘मूलभूत नीतिमूल्ये आणि चांगल्या प्रशासनासाठी कार्य करणे हे ‘आयओए’चे कर्तव्य आहे, पण सुरेश कलमाडी आणि अभयसिंह चौटाला या आरोपपत्र दाखल झालेल्या दोन व्यक्तींना त्यांनी आजीव अध्यक्ष केले आहे. आम्ही नोटीस बजावून सरकारी निधी का रोखू नये अशी विचारणा केली आहे. आयओसीची संहिता, आपल्याच संघटनेची घटना आणि राष्ट्रीय क्रीडा आचारसंहिता यांचा उल्लंघन करणार असाल तर सरकारला विचार करावा लागेल. आयओए आणि राष्ट्रीय क्रीडा महासंघ दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायक्षेत्रात येतात, कारण ते राज्यांप्रमाणे कारभार करतात.’

आधीचा संदर्भ
गोयल यांनी आधीचा संदर्भ दिला. पूर्वी चौटाला यांची अध्यक्षपदी निवड केल्याबद्दलच ‘आयओसी’ने ‘आयओए’ची मान्यता रद्द केली होती. आरोपपत्र दाखल झालेल्या व्यक्ती संघटनेत नसतील अशी अट घटनेत घातल्याशिवाय कारवाई मागे घेणार नाही, असे बजावण्यात आले होते. चौटाला आणि ललित भानोत यांना हटविल्यानंतरच ‘आयओसी’ने मान्यता पुन्हा दिली होती, असे गोयल यांनी नमूद केले.

ते पुढे म्हणाले, सरकारचा पाठिंबा तसेच मदत घेणारे आणि देशाचे प्रतिनिधित्व करणारे कुणीही सरकारपेक्षा श्रेष्ठ असू शकत नाही. कोणत्याही स्वतंत्र संघटनेला काहीही करण्याचे आणि अयोग्य मार्गाने कारभार करण्याचे स्वातंत्र्य नाही. आपण खेळाच्या की स्वतःच्या प्रसारासाठी येथे आलो आहोत हे ‘आयओए’ने ठरवावे. ते ऐकतील आणि राजीनामा देतील असे मला वाटते.

आज उत्तर नाही; आधी ‘आयओसी’शी चर्चा
नवी दिल्ली - क्रीडा मंत्रालयाने बजावलेल्या नोटिशीला शुक्रवारपर्यंत उत्तर दिले जाणार नाही, कलमाडी आणि चौटाला यांच्या नियुक्तीविषयी आम्ही आधी आंतरराष्ट्रीय शिखर संघटनेशी चर्चा करू, असे स्पष्टीकरण ‘आयओए’च्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने दिले. त्याने सांगितले, की ‘आयओए’ अध्यक्ष देशाबाहेर आहेत. ते न्यूझीलंडमध्ये आहेत. अशा कारणे दाखवा नोटिशीला आम्ही थेट उत्तर देऊ शकत नाही. ऑलिंपिक संहितेनुसार ‘आयओए’ला स्वायत्त दर्जा आहे. सरकारी हस्तक्षेपापासून आम्ही स्वतंत्र आहोत. त्यामुळे सहसा आम्ही उत्तर दिले नसते. आम्ही कदाचित उत्तर देऊ, पण त्यापूर्वी ‘आयओसी’शी चर्चा करू. त्यानंतरच हे घडण्याची शक्‍यता आहे.

क्रीडा

श्रीपेरंबुदूर - मुंबईच्या सौरव बंदोपाध्याय याने राष्ट्रीय रेसिंग मालिकेतील ॲमीओ करंडक स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीतील पहिली शर्यत...

09.24 AM

लखनौ - नऊ सामन्यांत अवघा एकच विजय मिळवल्यामुळे प्रो- कबड्डीच्या पाचव्या मोसमात हेलकावे खात असलेल्या तेलुगू टायटन्सला यू मुम्बाने...

09.24 AM

आव्हान देण्याचीही श्रीलंका संघाची मानसिक तयारी नाही दाम्बुला - कसोटी मालिकेतील धवल यशानंतर श्रीलंकेविरुद्धच्या मर्यादित...

09.21 AM