धोनी अडकला वादात, बिहारच्या बेगूसरायमध्ये FIR दाखल - काय आहे प्रकरण

या प्रकरणातील आरोपींमध्ये धोनीशिवाय इतर 7 जणांची नावे आहेत.
MS Dhoni Latest News
MS Dhoni Latest NewsMS Dhoni

MS Dhoni Against FIR: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. बिहारच्या बेगूसरायमध्ये महेंद्रसिंग धोनी विरोधात FIR दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपींमध्ये धोनीशिवाय इतर 7 जणांची नावे आहेत. वास्तविक हे प्रकरण फसवणुकीशी संबंधित आहे.(MS Dhoni Latest News)

खत विक्रेत्याने हा गुन्हा धोनीसह इतर 7 जणांविरुद्ध दाखल केला आहे. 30 लाखांचा चेक बाऊन्स झाल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप केला आहे. खरं तर हा दोन कंपन्यांमधील वाद आहे. एसके एंटरप्रायझेस बेगुसराय नावाच्या एजन्सीशी बॉण्ड ठेवले होते. कंपनीच्या वतीने एजन्सीकडे खत पाठविण्यात आले मात्र तेथून मार्केटिंगला सहकार्य करण्यात आले नाही.

उत्पादन विक्री करताना कंपनीने सहकार्य केले नाही, त्यामुळे खत मोठ्या प्रमाणात शिल्लक राहिलं असा आरोप आहे. यानंतर एजन्सीचे मालक नीरज यांनी कंपनीवर आणि सहकाऱ्यांवर आरोप करत आपले नुकसान झाल्याचे सांगितले.

आधी एजन्सीने उत्पादनासाठी कंपनीला 36.81 लाख दिले. नंतर तक्रार केल्यावर कंपनीने एजन्सी कडून खत परत घेतले आणि त्याबदल्यात 30 लाखांचा धनादेश दिला. मालकाने धनादेश बँकेत पाठवला असता तो बाऊन्स झाला. याबाबत वारंवार माहिती देऊनही कंपनीच्या अधिकाऱ्यांनी किंवा प्रतिनिधींनी लक्ष दिले नाही.

चेक बाऊन्स झाल्याबद्दल एजन्सी मालकाच्या वकिलाने कंपनीला कायदेशीर नोटीसही पाठवली. पण त्यावर तोडगा निघालेला नाही किंवा कंपनीनेही योग्य उत्तर दिलेले नाही. या प्रकरणी नीरज कुमार निराला यांनी यानंतर कंपनीचे सीईओ राजेश आर्य आणि कंपनीच्या इतर सात पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या उत्पादनाची जाहिरात महेंद्रसिंग धोनीने केली होती, त्यामुळे त्याचे नावही तक्रारीत नोंदवले आहे.

महेंद्रसिंग धोनीने या उत्पादनाची जाहिरात केली होती. त्यामुळे नीरज कुमार निराला यांनी धोनीविरोधात गुन्हाही दाखल केला आहे. न्यायालयाने ही बाब मान्य केली असून त्यावर पुढील सुनावणी २८ जून रोजी होणार आहे. या प्रकरणात महेंद्रसिंग धोनीचे नाव आल्याने हे प्रकरण चर्चेत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com