Asia Cup : धोनी भारताचा पुन्हा 'कर्णधार'

MS Dhoni Captains India In ODIs For The 200th Time
MS Dhoni Captains India In ODIs For The 200th Time

दुबई : आशिया करंडक स्पर्धेत अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला पुन्हा कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. धोनीचा कर्णधार म्हणून हा 200 वा सामना आहे. आशिया करंडकासाठी विराट कोहलीला विश्रांती देण्यात आल्याने भारतीय संघाचे नेतृत्व सलामीवीर रोहित शर्माकडे देण्यात आले आहे.
 

भारतीय संघ यापूर्वीच आशिया करंडकाच्या अंतिम फेरीत पोहोचल्याने रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे भारतीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी पुन्हा एकदा भारताचा सर्वात यशस्वी आणि कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीकडे सोपविण्यात आली. तब्बल 696 दिवसांनंतर धोनी भारताचे कर्णधारपद भूषवत आहे. धोनी हा भारताचा सर्वात वयस्कर कर्णधार असणार आहे. त्याचे सध्याचे वय 37 वर्षे 80 दिवस आहे.
 

मैदानावर नाणेफेकीच्यावेळी रोहित ऐवडू धोनी आल्याने सर्व प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या गेल्या होत्या. एकदिवसीय सामन्यांमध्ये संघाचे 200 वेळा नेतृत्व करणारा तो आशिया खंडातील पहिला खेळाडू ठरला आहे. तसेच वेगवान गोलंदाज दिपक चहरही या सामन्यातून पदार्पण करत आहे. शिखर धवन, भुवनेश्वर कुमार आणि जसप्रित बुमरा यांना विश्रांती देण्यात आली असून मनिष पांडे आणि खलील अहमद यांना संघात स्थान देण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com