पुण्यात 'धोनीऽऽ धोनीऽऽचा जयघोष 

पांडुरंग सरोदे, योगेश बनकर
शनिवार, 13 मे 2017

पुणे : 'धोनीऽऽ.. धोनीऽऽ...' संपूर्ण सभागृहामध्ये हाच आवाज होता. कारण स्पष्ट आहे.. भारतीय क्रिकेट संघाचा सर्वांत यशस्वी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आज (शनिवार) पुण्यात होता. निमित्त होते 'सकाळ प्रकाशना'च्या सुनंदन लेले लिखित 'कांगारू' या पुस्तकाच्या इंग्रजी आवृत्तीच्या प्रकाशनाचे.. 

धोनी सभागृहात दाखल झाल्यापासून उपस्थितांनी त्याच्या नावाचा जयघोष करण्यास सुरवात केली. धोनीनेही मनसोक्त 'बॅटिंग' केली. 

'कष्टाला पर्याय नाही.. भूतकाळ किंवा भविष्यकाळात जगण्यापेक्षा वर्तमानात जगा' असा सल्ला धोनीने देताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. भारतीय संघाचे कर्णधारपद, यष्टिरक्षकाची भूमिका, संघाला प्रोत्साहित करणे आणि जिंकण्यासाठीचे कष्ट या सर्व गोष्टींवर धोनीने लेले यांच्याशी संवाद साधला. 

तुम्हाला चांगला क्रिकेटपटू म्हणून 15 वर्षे लोक ओळखतील. पण त्यानंतर काय? म्हणून मी कायम चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न करत असतो. चांगला माणूसच कायम लोकांच्या स्मरणात राहतो. 
- महेंद्रसिंह धोनी, भारतीय संघाचा यष्टिरक्षक