राष्ट्रीय किशोर कबड्डीही आता रंगणार मॅटवर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 मार्च 2017

मुंबई - भारतीय कबड्डी महासंघाने राष्ट्रीय किशोर कबड्डी स्पर्धा यंदापासून मॅटवर घेण्याचे ठरवले आहे. अर्थातच, पुढील महिन्यात तमिळनाडूत होणारी ही स्पर्धा मॅटवरच घेण्याचा अंतिम निर्णय झाला आहे.

भारतीय कबड्डी महासंघाने ही स्पर्धा मॅटवर घेण्याचा निर्णय सहभागी संघांना कळवला आहे. आंतरराष्ट्रीय कबड्डी मॅटवरच होत आहे. किशोर वयातच कबड्डीपटूंना मॅटवर खेळण्याची सवय व्हायला हवी. याच उद्देशाने आम्ही ही स्पर्धा मॅटवर खेळवण्याचे ठरवले असल्याचे भारतीय कबड्डी महासंघाचे सीईओ देवराज चतुर्वेदी यांनी सांगितले. 

राष्ट्रीय किशोर कबड्डी स्पर्धा कोईम्बतूरला १३ ते १६ एप्रिलदरम्यान होईल. एमएस कॉलेज चिन्नमवेदामपट्टी मैदानावर ही स्पर्धा होईल. त्यासाठी मॅटची सहा मैदाने तयार करण्यात येतील. त्यात तीन मुलांची आणि तीन मुलींची असतील. कॉलेजचे ग्राऊंड मोठे आहे, त्यामुळे मॅटचे मैदान वसवण्यासाठी जागेचा कोणताही प्रश्‍न नाही, तसेच आमच्यासमोर मॅटचाही प्रश्‍न नाही, असे तमिळनाडू कबड्डी संघटनेचे सचिव सैफुल्ला यांनी सांगितले. 

प्रत्येक राज्यात आता पुरेशा मॅट्‌स आहेत. सरकारने त्यासाठी साह्य केले आहे. कबड्डीपटू घडण्याच्या वयात त्यांनी मॅटवरच खेळायला हवे. हाच विचार करून राष्ट्रीय किशोर स्पर्धा मॅटवर खेळवण्याचे ठरवले आहे.
-देवराज चतुर्वेदी

Web Title: National kabaddi played on matt