गतविजेत्या नटराजचे पारडे जड

Aishwarya-Pise
Aishwarya-Pise

बडोदा - गतविजेता आर. नटराज एमआरएफ मोग्रीप राष्ट्रीय दुचाकी रॅली मालिकेत संभाव्य विजेता मानला जात आहे. रविवारी बडोद्याजवळील जारोड गावात सुरू होणाऱ्या मालिकेत महिलांचा सहभाग आकर्षण ठरला आहे. पहिल्या फेरीला ५५ स्पर्धकांचा विक्रमी प्रतिसाद मिळाला आहे.

सलग दुसऱ्या वर्षी गुजरातमध्ये मालिका सुरू होईल. बडोद्याच्या १२ रायडर्सनी भाग घेतला आहे. मालिकेचे प्रवर्तक असलेल्या गॉडस्पीड रेसिंगचे संचालक श्‍याम कोठारी यांनी सांगितले की, विक्रमी प्रतिसादावरून तरुणांमध्ये रेसिंग लोकप्रिय होत असल्याचे दिसून येते. खेळासाठी हे उत्साहवर्धक चिन्ह आहे. 

शेवटच्या दोन फेऱ्या वर्षाअखेरीस दक्षिणेत होतील. पश्‍चिमेत इंदूरला पाच व सहा मे रोजी दुसरी, पुण्यात १९ व २० मे रोजी तिसरी, तर नाशिकला २५ ते २७ मे दरम्यान चौथी फेरी होईल. पश्‍चिमेतील फेऱ्यांचे संयोजक असलेल्या एडब्ल्यू इव्हेंट्‌सचे प्रमुख अमित वाघचौरे यांनी सांगितले की, पुण्याच्या एप्रिलीया रेसिंगचा पिंकेश रायडर भाग घेत आहे. गेल्या वर्षी ३५ जणांचा सहभाग होता. यंदा हा आकडा ५०च्या पुढे गेला आहे. शनिवारी समारंभपूर्वक प्रारंभ होईल. रविवारी रॅली थरारक होईल. जारोड गावातील ७५ किलोमीटर परिसरातील मार्गात स्पर्धात्मक अंतर ५० किमी असेल. आम्ही सुरक्षितता आणि संयोजनाच्या बाबतीत काटेकोर नियोजन केले आहे.

एर्डास स्पीडवे रेसिंग अँड ॲडव्हेंचर स्पोर्टस तसेच टीम बडोदा रेसिंग हे स्थानिक संयोजक आहेत.

पिंकेशच्या साथीला पुण्याचा अमरेंद्र साठे असेल. नाशिकचे कौस्तुभ, नीलेश ठाकरे व हितेन ठक्कर यांचाही सहभाग असेल. टीव्हीएसचा अब्दुल वाहिद तन्वीर गोव्यातील सुपरक्रॉस शर्यतीत जखमी झाला. त्यामुळे तो भाग घेऊ शकणार नाही. नटराजच्या जोडीला स्कूटर विजेता असिफ अली व शमीम 
खान असतील.

रॅलीचे क्‍लास 
क्‍लास १ - सुपराईक प्रोएक्‍स्पर्ट, क्‍लास १ ए - सुपरबाईक प्रोएक्‍स्पर्ट-ए, क्‍लास २ (सुपरस्पोर्ट१३० बी), क्‍लास ३ - सुपरस्पोर्ट १६५ बी, क्‍लास ४ (सुपरस्पोर्ट २६० बी), क्‍लास ५ - सुपरस्पोर्ट ४०० बी, क्‍लास ६ - सुपरस्पोर्ट ५५० बी, क्‍लास ७ ः स्कूटर, क्‍लास ८ - महिला, क्‍लास ९ - स्थानिक.

ऐश्‍वर्या आकर्षण
टीव्हीएस रेसिंगची ऐश्‍वर्या पिसे गतविजेती आहे. गुरमेल कौर, फझीला, खुशबू पंड्या व रिचा पटेल यांचाही सहभाग आहे. गेल्या वर्षी चार महिला होत्या. यावेळी हा आकडा वाढला आहे. रेसिंगची पुरुषांचा खेळ अशी ओळख असली तरी महिलांचा वाढता सहभाग उत्साहवर्धक आहे.

ऐश्‍वर्या आकर्षण
टीव्हीएस रेसिंगची ऐश्‍वर्या पिसे गतविजेती आहे. गुरमेल कौर, फझीला, खुशबू पंड्या व रिचा पटेल यांचाही सहभाग आहे. गेल्या वर्षी चार महिला होत्या. यावेळी हा आकडा वाढला आहे. रेसिंगची पुरुषांचा खेळ अशी ओळख असली तरी महिलांचा वाढता सहभाग उत्साहवर्धक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com