जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत पी. व्ही. सिंधू दुसऱ्या स्थानी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 एप्रिल 2017

नवी दिल्ली - भारतीय बॅडमिंटनची नवी तारका आणि रिओ ऑलिंपिकची रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधू जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत दुसऱ्या स्थानी आली आहे. सातत्यपूर्ण कामगिरीने सिंधूने पाचव्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर झेप घेतली.

गेल्या आठवड्यात इंडियन ओपन स्पर्धा जिंकल्यानंतरच तिचे दुसरे स्थान निश्‍चित झाले होते. त्यावर आज केवळ शिक्कामोर्तब झाले.

जागतिक क्रमवारीत पहिल्या पाचांत येणारी सिंधू ही दुसरी भारतीय बॅडमिंटनपटू ठरली आहे. यापूर्वी साईना नेहवाल हिने अव्वल स्थानापर्यंत मजल मारली होती. नव्या क्रमवारीत साईनाचे पहिल्या दहातील स्थान कायम राहिले असले, तरी तीचे स्थान एकने घसरले आहे. ती आता नवव्या स्थानावर आली आहे.