श्रीलंकेतील बिकट परिस्थितीतही पाकला 'ऑल इज वेल'चं फिल

Pakistan Sri Lanka series
Pakistan Sri Lanka seriesSakal

Pakistan Sri Lanka series : राजकीय परिस्थितीचा पाकच्या श्रीलंका दौऱ्यावर कोणताही परिणाम होणार नाही, असा विश्वास पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने व्यक्त केला आहे. सध्याच्या घडीला श्रीलंका अर्थिक संकटात सापडला असून देशातील सर्वच मत्र्यांनी राजीनामा दिलाय. श्रीलंकेतील परिस्थितीत दिवसेंदिवस बिघडत असताना त्याचा परिणाम क्रीडा क्षेत्रातील घडामोडींवर होताना दिसतोय.

श्रीलंकेतील (Sri Lanka) परिस्थितीमुळे त्याठिकाणी आयपीएल सामन्यांचे प्रेक्षपण थांबवण्याची वेळ आलीये. त्यामुळे श्रीलंकेत आयोजित होणाऱ्या आशिया कप (Asia Cup) स्पर्धेवरही प्रश्नचिन्ह उपस्थितीत राहिले आहे. याच दरम्यान पाकिस्तान संघाचा (Pakistan Cricket Team) श्रीलंका दौराही अडचणीत सापडण्याची भिती व्यक्त करण्यात येत होती. मात्र पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून या वृत्ताला तुर्तास तरी पुर्णविराम देण्याचा प्रयत्न केलाय.

Pakistan Sri Lanka series
विराटनं धावांच्या दुष्काळातून जाणाऱ्या ऋतुराजच्या खांद्यावर टाकला हात

पाकिस्तान संघ जुलै-ऑगस्टमध्ये श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात दोन कसोटी सामन्यांसह तीन वनडे सामन्यांची मालिका नियोजित आहे. श्रीलंकेतील परिस्थितीमुळे या दौऱ्यावर कोणताही परिणाम होणार नाही, असे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने म्हटले आहे. यासाठी त्यांनी श्रीलंकन क्रिकेट बोर्डाचा दाखला दिलाय.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानचा नियोजित श्रीलंका दौरा ठरल्याप्रमाणेच होईल. या दौऱ्यातील बदलासंदर्भात श्रीलंका बोर्डाने कोणतीही सूचना केलेली नाही, असे पाक क्रिकेट बोर्डाने म्हटले आहे.

Pakistan Sri Lanka series
'विराटनं कॅमेरामनला जे सांगितलं ते आठवलं की आजही अंगावर शहारे येतात'

यंदाच्या वर्षी वेस्ट इंडीज इंग्लंडही करणार पाक दौरा

ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा नुकताच यशस्वीरित्या पार पडला. ऑस्ट्रेलियन संघ या दौऱ्यात तीन कसोटी, तीन वनडे आणि एकमेव टी-20 सामन्याची मालिका खेळवण्यात आली. या दौऱ्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मोठा दिलासा मिळाला आहे. सुरक्षिततेच्या मुद्यावरुन पाकिस्तान दौऱ्यावर येण्यास नकार देणाऱ्या इंग्लंडचे वेलकम करण्याची तयारीही त्यांनी सुरु केलीय. याशिवाय वेस्ट इंडीज संघही पाकिस्तानचा दौरा करणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com