रविवारी कोळ्यांचीही होणार पॉवर बोट रेस

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 मार्च 2017

मुंबई - मुंबईत येत्या रविवारी होत असलेल्या पॉवर बोट शर्यतीत बोटीवरचे आपलेही कौशल्य दाखवण्याची संधी कोळी समाजाला मिळणार आहे. मरिन्स लाइन्सच्या समुद्रात एरवी मच्छीमार बोटीने प्रवास करणारे कोळी बांधव या वेळी मात्र स्पर्धा करणार आहेत.

मुंबई - मुंबईत येत्या रविवारी होत असलेल्या पॉवर बोट शर्यतीत बोटीवरचे आपलेही कौशल्य दाखवण्याची संधी कोळी समाजाला मिळणार आहे. मरिन्स लाइन्सच्या समुद्रात एरवी मच्छीमार बोटीने प्रवास करणारे कोळी बांधव या वेळी मात्र स्पर्धा करणार आहेत.

पॉवर बोट शर्यत ही मुंबईसाठी नवा अनुभव असणार आहे. इंग्लंड, अमेरिका यांसारख्या देशात ही स्पर्धा होत असते. आता मुंबईतही हा थरार रंगणार आहे. स्पर्धेचे संयोजक प्रोकॉम कंपनीने या स्पर्धेत कोळी समाजालाही समावून घेतले आहे. त्यांची शर्यत मात्र प्रायोगिक आहे. मुख्य शर्यत दुपारी ४ वाजता सुरू होईल त्या अगोदर कोळी समाजाची शर्यत होईल. ही शर्यत मात्र मुख्य ट्रॅकच्या बाजूने होईल. 

कोळी समाजाच्या या शर्यतीत उत्तन, वर्सोवा, मालवणी, माहीम, वरळी, कफपरेड, गिरगाव आणि कुलाबा असे आठ कोळीवाड्यांचे स्पर्धेत सहभागी होत आहेत प्रत्येक कोळीवाड्यांच्या पाच बोटी अशा एकूण ४० बोटींची ही शर्यत होईल. 

या नवा अनुभवासाठी आम्हीही उत्सुक आहोत, असे दक्षिण मुंबई कोळी संघटनेचे अध्यक्ष रोहिदास कोळी यांनी सांगितले. खरे तर आम्हाला सर्व कोळीवाड्यांना सहभागी करुन घ्यायचे होते, परंतु वेळीची मर्यादा असल्यामुळे या पहिल्याच प्रयत्नांत आठ कोळीवाड्यांचे संघ सहभागी होतील, असे ते म्हणाले. 

कोळी समाज हा मुंबईचा भूमिपुत्र आहे, बोटीवरून मच्छीमारी करणे हा आमचा व्यवसाय आहे त्यामुळे वेगळा सराव करण्याची गरज नाही. पॉवर बोटप्रमाणे आमच्या बोट नसतील मच्छीमारी करताना वापरण्यात येणाऱ्याच आमच्या बोटी असतील, असे रोहिदास म्हणाले. आता होळीच्या सणही जवळ येत आहे त्यामुळे जी बोट अधिक आकर्षकपणे रंगवली जाईल, तिला विशेष पुरस्कार देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. 

उष्णतेचे आव्हान
मरिन्स लाइन्सच्या समुद्रात या रेससाठी ट्रॅक तयार करण्यात आला आहे. परदेशी संघही दाखल झाले असून त्यांनी सराव सुरू केला आहे. मुंबईतील वाढत्या उष्णतेचे आव्हान असेल. हवेतील आर्द्रताही अधिक असल्यामुळे शरीरातील पाणी कमी होण्याचाचा (डिहायड्रेशन) त्रास होऊ शकतो, असे एका स्पर्धकाने सांगितले. एरवी अशा शर्यती आम्ही भरतीच्या दोन तास अगोदर किंवा दोन तासनंतर घेत असतो; परंतु मुंबईतील शर्यतीसाठी यात बदल करण्यात आल्याचेही सांगण्यात आले.

Web Title: power boat race