प्रिती झिंटाच्या 'मेड इन इंडिया'वर विदेशात असलेल्या ललित मोदींची प्रतिक्रिया

Preity Zinta Tweet About IPL Media Rights Lalit Modi Reaction Gone Viral
Preity Zinta Tweet About IPL Media Rights Lalit Modi Reaction Gone Viralesakal

आयपीएल ही सोन्याची अंडी देणारी बीसीसीआयची कोंबडी ज्यांच्या कल्पनेतून अस्तित्वात आली ते ललित मोदी पुन्हा एका चर्चेचा विषय झाले आहेत. आयपीएलच्या 2023 ते 2027 मध्ये होणाऱ्या पाच हंगामांसाठी मीडिया राईट्सची लिलाव प्रक्रिया सुरू आहे. याबाबत पंजाब किंग्जची सहमालक प्रिती झिंटाने एक ट्विट केले. या ट्विटवर आयपीएलची पायभरणी करणाऱ्या लिलत मोदींनी ट्विट करून प्रतिक्रिया दिली. सध्या ही प्रतिक्रिया चांगलीच व्हायरल होत आहे. (Preity Zinta Tweet About IPL Media Rights Lalit Modi Reaction Gone Viral)

Preity Zinta Tweet About IPL Media Rights Lalit Modi Reaction Gone Viral
PSL च्या संपूर्ण मीडिया राईट्स 'कमाई'वर IPLची एक मॅच पडते भारी

प्रिती झिंटाने आपल्या फोटोसह ट्विट केले की, 'बीसीसीआयकडून नव्या आयपीएल मीडिया राईट्सची घोषणा ऐकण्यासाठी वाट बघत आहे. आयपीएल एक अविश्वसनीय स्पोर्ट्स प्रॉपर्टी झाली आहे. जगभरात हजारो, लाखो लोकांना राजगार मिळतोय. आयपीएलच्या अविश्वसनीय विकासामुळे इतर खेळांच्या लीग देखील छोट्या होत आहेत. ही पूर्णपणे मेड इन इंडिया आहे.'

पंजाब किंग्जची सहमालक असलेल्या प्रिती झिंटाच्या या ट्विटवर ललित मोदींनी देखील आपली प्रतिक्रिया दिली. त्यांनी 'एक दीर्घ श्वास घ्या आणि फक्त हसा.'

Preity Zinta Tweet About IPL Media Rights Lalit Modi Reaction Gone Viral
वयाच्या तिशीत इंग्लंडच्या जेम्सचा अनोखा विक्रम, सचिनला टाकलं मागे

भारतात आयपीएल सुरू करण्याचे श्रेय ललित मोदींना जाते. 2005 ते 2010 पर्यंत ललित मोदी बीसीसीआयचे उपाध्यक्ष होते. मात्र 2010 मध्ये त्यांच्यावर आयपीएलमध्ये हेराफेरी केल्याचे आरोप झाले. त्यानंतर बीसीसीआयने त्यांच्यावर बंदी घातली. याचबरोबर मनी लाँड्रिंगचे आरोप त्यांच्यावर झाल्यानंतर ललित मोदींनी भारतातून पळ काढत विदेशात स्थायिक झाले.

बीसीसीआयला टीव्ही आणि डिजीटल मीडिया राईट्समधून जवळपास 44075 कोटी रूपयांची कमाई होणार आहे. यामुळे आयपीएल ही क्रीडा जगतातील सर्वात श्रीमंत लीग पैकी एक होणार आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार 2033 ते 2027 दरम्यान होणाऱ्या 410 आयपीएल सामन्यासाठी पॅकेज अ 23575 कोटी रूपयात विकले गेले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com