पी. व्ही. सिंधूची फायनलमध्ये धडक

वृत्तसंस्था
शनिवार, 16 सप्टेंबर 2017

ऑलिंपिक आणि जागतिक स्पर्धेतील रौप्यपदक विजेती पी. सिंधू हिने चीनच्या हे बिंगजिओ हिचा 21-10, 17-21, 21-16 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. सिंधूची आता अंतिम फेरीत जपानच्या नोझोमी ओकुहारा हिच्याशी लढत होणार आहे.

सोल - भारताच्या पी. व्ही. सिंधू हिने कोरिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. 

ऑलिंपिक आणि जागतिक स्पर्धेतील रौप्यपदक विजेती पी. सिंधू हिने चीनच्या हे बिंगजिओ हिचा 21-10, 17-21, 21-16 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. सिंधूची आता अंतिम फेरीत जपानच्या नोझोमी ओकुहारा हिच्याशी लढत होणार आहे. सिंधू प्रथमच कोरिया ओपन सुपरसिरीजच्या अंतिम फेरीत खेळणार आहे. या सामन्यात आक्रमक खेळाचे प्रदर्शन करताना सिंधूनं पूर्ण कोर्टचा उपयोग केला. तिचे फोरहँडच्या फटक्यांनी सामन्याचा निर्णय तिच्या बाजूने लावला. हा सामना जिंकण्यासाठी सिंधूला 63 मिनिटे लागली. 

सिंधूने नुकतेच जागतिक स्पर्धेत खेळताना अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. पण, तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. आता कोरिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत तिला सुवर्णपदक मिळविण्याची संधी आहे. 

Web Title: PV Sindhu beats China's He Bingjiao 21-10, 17-21, 21-16 to reach Korea Open Superseries final