सिंधू जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी

वृत्तसंस्था
गुरुवार, 6 एप्रिल 2017

या मोसमातील कामगिरीच्या आधारावर सिंधूने जागतिक क्रमवारीत दुसऱे स्थान मिळविले आहे. भारताची फुलराणी अशी ओळख असलेल्या साईना नेहवालने 2015 मध्ये क्रमवारीत अव्वल स्थान मिळविले होते.

नवी दिल्ली - ऑलिंपिक रौप्य पदक विजेती भारताची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. तिच्या कारकिर्दीतील ही सर्वोत्तम रँकिंग आहे.

रिओ ऑलिंपिक स्पर्धेत सिंधूला रौप्य पदक मिळाले होते. त्यानंतर तिच्या कामगिरीत खूप सुधारणा झाली असून, तिने नुकतेच इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेचेही विजेतेपद मिळविले होते. रिओ ऑलिंपिकमध्ये तिला पराभूत करणाऱ्या कॅरोलिन मरीनचा पराभव तिने केला होता. मात्र, मलेशिया ओपन स्पर्धेत तिला पहिल्याच फेरीतून बाहेर व्हावे लागले होते.

या मोसमातील कामगिरीच्या आधारावर सिंधूने जागतिक क्रमवारीत दुसऱे स्थान मिळविले आहे. भारताची फुलराणी अशी ओळख असलेल्या साईना नेहवालने 2015 मध्ये क्रमवारीत अव्वल स्थान मिळविले होते. मात्र, सध्या ती दुखापतीने त्रस्त असून, तिच्या क्रमवारीवरही परिणाम झालेला आहे.