लोढा समितीच्या शिफारशींसाठी शुक्लांच्या नेतृत्वाखाली समिती

वृत्तसंस्था
मंगळवार, 27 जून 2017

या सात सदस्यीय समितीचे राजीव शुक्ला अध्यक्ष असणार आहेत. या समितीत सौरव गांगुली, टी. सी. मॅथ्यू, नाबा भट्टाचार्य, जय शहा, अनिरुद्ध चौधरी आणि अमिताभ चौधरी यांचा समावेश आहे.

नवी दिल्ली - न्यायाधीश आर. एम. लोढा यांच्या समितीने लागू केलेल्या शिफारशी लागू करण्यासाठी आयपीएलचे प्रमुख राजीव शुक्ला यांच्या नेतृत्वाखाली सात सदस्यीय समितीची नियुक्ती करण्यात आली आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आज या समितीची घोषणा केली असून, या समितीचे समन्वयक सचिव अमिताभ चौधरी असणार आहेत. चौधरी यांनी सांगितले, की न्यायाधीश लोढा यांनी 18 जुलै 2016 मध्ये केलेल्या शिफारशी लागू करण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे. मुंबईत 26 जूनला झालेल्या विशेष बैठकीत शिफारशी लागू करण्यासाठी समिती बनविण्यात आली आहे. सात सदस्यीय समिती सर्वोच्च न्यायालयाकडे शिफारशी लागू करण्याबाबतची माहिती देणार आहे. सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी 14 जुलैला होणार आहे. त्यापूर्वीच 10 जुलैला समिती आपला अहवाल देणार आहे.

या सात सदस्यीय समितीचे राजीव शुक्ला अध्यक्ष असणार आहेत. या समितीत सौरव गांगुली, टी. सी. मॅथ्यू, नाबा भट्टाचार्य, जय शहा, अनिरुद्ध चौधरी आणि अमिताभ चौधरी यांचा समावेश आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :
अन् मोदींच्या पत्नीसाठी गार्डने उघडला कारचा दरवाजा​
कट्टर मुस्लिम दहशतवाद संपवून टाकू; मोदी-ट्रम्प यांचे संयुक्त निवेदन​
"काश्‍मिरी बांधवां'चे रक्त सांडणाऱ्या भारतीयांना धडा शिकवू: अल कायदा​
पुणे: चार धरणांत मिळून 0.12 टीएमसीने वाढ​
माण: बोअरवेलमध्ये पडलेल्या मंगेशचा अखेर मृत्यू
सलाहुद्दीनला ठरविले जागतिक दहशतवादी​
सर्जिकल स्ट्राइकवर एकही प्रश्‍न नाही: नरेंद्र मोदी​
मुख्यमंत्र्यांना विठ्ठल पूजेपासून रोखणार​
शाहू कार्यात तंत्रज्ञानाधारित रोजगाराची बीजं - डॉ. रघुनाथ माशेलकर​
३१ दिवस, पावणे चारशे तास आणि ४६ हजार पोळ्या​