मुंबईला आघाडी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016

म्हैसूर - अभिषेक नायरने अखेरच्या क्षणी मिळवलेल्या दोन बळींमुळे मुंबईला उत्तर प्रदेशविरुद्धच्या रणजी सामन्यात पहिल्या डावात नाममात्र आघाडी मिळाली. दुसऱ्या डावात चांगल्या सुरवातीनंतर दोन फलंदाज गमावल्यामुळे सामना पुन्हा रंगतदार अवस्थेत आला आहे. तुषार देशपांडेची शानदार वेगवान गोलंदाजीमुळे एक वेळ मुंबईने उत्तर प्रदेशची ७ बाद ११७ अशी दाणादाण उडवली होती; परंतु रिंकू सिंग (७०) व कुलदीप यादव (५०) यांनी केलेल्या शानदार फलंदाजीमुळे उत्तर प्रदेशने ८ बाद २१६ अशी मजल मारली होती. आघाडी घेण्यासाठी त्यांना अवघ्या १७ धावांची गरज असताना अभिषेक नायरने इम्तियाझ अहमद व कुलदीप यादव यांना बाद केले.

संक्षिप्त धावफलक - मुंबई २३३ आणि दुसरा डाव २ बाद ५१ (हेरवाडकर खेळत आहे १५, कौस्तुभ पवार २९). उत्तर प्रदेश पहिला डाव ः  २१६(रिंकू सिंग ७०, कुलदीप यादव ५०; देशपांडे ३-६६, नायर २-१९, दाभोळकर  २-२६, धुमाळ २-३३).

Web Title: ranaji cricket karandak competition