बोपण्णा-क्‍युव्हासची जोडी मास्टर 

वृत्तसंस्था
सोमवार, 24 एप्रिल 2017

मॉंटे-कार्लोमधील स्पर्धेत मी अनेक वेळा सहभागी झालो. ही फार मोठी ऐतिहासिक स्पर्धा आहे. अशा स्पर्धेत आमच्या जोडीने पहिले विजेतेपद मिळविल्याचा आनंद वाटतो. यामुळे क्‍ले कोर्ट मोसमाची सुरवात छान झाली असून, पुढील स्पर्धांसाठी मी आतूर झालो आहे. 
- रोहन बोपण्णा 

मॉंटे कार्लो - रोहन बोपण्णाने ऊरुग्वेचा जोडीदार पाब्लो क्‍युव्हास याच्या साथीत मॉंटे कार्लो मास्टर्स टेनिस स्पर्धेत विजेतेपद मिळविले. मानांकन नसलेल्या या जोडीने सातव्या स्पेनच्या फेलिसियानो लोपेझ-मार्क लोपेझ यांना 6-3, 3-6, 10-4 असे हरविले. 

बोपण्णा-क्‍युव्हासने दुसऱ्या फेरीत पाचव्या मानांकित रावेन क्‍लासेन-राजीव राम; तर उपांत्यपूर्व फेरीत अग्रमानांकित, तसेच ऑस्ट्रेलियन विजेत्या हेन्री कॉंटीनन-जॉन पीअर्स यांना हरविले होते. उपांत्य फेरीत त्यांनी दोन सेटमध्येच विजय नोंदविला होता. 

मॉंटे-कार्लोमधील स्पर्धेत मी अनेक वेळा सहभागी झालो. ही फार मोठी ऐतिहासिक स्पर्धा आहे. अशा स्पर्धेत आमच्या जोडीने पहिले विजेतेपद मिळविल्याचा आनंद वाटतो. यामुळे क्‍ले कोर्ट मोसमाची सुरवात छान झाली असून, पुढील स्पर्धांसाठी मी आतूर झालो आहे. 
- रोहन बोपण्णा 

दृष्टिक्षेपात 
- बोपण्णा-क्‍युव्हासचे जोडी म्हणून पहिलेच एटीपी विजेतेपद 
- यंदाच्या मोसमाच्या प्रारंभी ही जोडी एकत्र आली 
- पहिल्याच एटीपी फायनलमध्ये विजेतेपदाला गवसणी 
- प्रत्येकी एक हजार एटीपी गुणांची कमाई 
- 25 हजार 950 युरो बक्षीस रक्कम वाटून घेणार 
- बोपण्णाचे मोसमातील दुसरे विजेतेपद 
- जीवन नेदून्चेझीयनच्या साथीत चेन्नई ओपन जिंकून सलामी 
- दुबई ओपनमध्ये पोलंडच्या मार्सीन मॅट्‌कोस्कीच्या साथीत अंतिम फेरी 
- बोपण्णाचे चौथे मास्टर्स विजेतेपद व एकूण 16वे एटीपी विजेतेपद 
- क्‍युव्हासचेही मोसमातील दुसरे विजेतेपद 
- याआधी रिओ ओपनमध्ये पाब्लो कॅर्रेनो बुस्टासह विजेता 

Web Title: Rohan Bopanna and Pablo Cuevas win Monte Carlo Masters doubles crown