रोहित विक्रमातही HIT !

Rohit Sharma double century mohali ODI Marathi news sports cricket
Rohit Sharma double century mohali ODI Marathi news sports cricket

पहिल्या वन डेमधील पराभवानं जणू खवळून उठलेल्या कर्णधार रोहित शर्मानं आज (बुधवार) श्रीलंकेच्या गोलंदाजांची अक्षरशः वाट लावली. एकापाठोपाठ एक अनेक विक्रमांची नोंद रोहितनं आजच्या एका खेळीनं केली. 

दोन दिवसांपूर्वी भारताची 7 बाद 29 अशी ऐतिहासिक अवस्था करणारे श्रीलंकेचे गोलंदाज आज मोहालीच्या ग्राऊंडवर रोहितसमोर शाळकरी टीमचे शिकावू खेळाडू भासले. 

अवघ्या 153 चेंडूत 13 चौकार आणि तब्बल 12 षटकारांसह 208 धावांची खेळी साकारताना रोहितनं वन डेमधल्या तिसऱया विक्रमी द्विशतकाची नोंद केली. 

नेहमीप्रमाणे सावध सुरूवात करणाऱया रोहितनं पहिला धाव करायला आज नऊ चेंडू घेतले. भारताच्या डावातील दहा ओव्हर संपल्या, तेव्हा रोहित तब्बल 32 चेंडू खेळला होता आणि धावा होत्या 15. सलामीवीर साथीदार शिखर धवनने 47 चेंडूत अर्धशतक झळकवले, तेव्हा रोहितच्या धावा होत्या 41 चेंडूत 23. 

धवन बाद झाल्यावर श्रेयस अय्यर साथीला असताना 24 व्या षटकात रोहितनं अर्धशतक पूर्ण केले. त्यासाठी रोहितन तब्बल 65 चेंडू घेतले. अर्धशतकानंतर रोहित सुस्साट सुटला. अर्धशतकानंतरच्या अवघ्या 50 चेंडूत (एकूण 115 चेंडू) त्यानं शतक पूर्ण केलं. 40 व्या षटकातील तिसऱया चेंडूवर 16 वे शतक पूर्ण करताना रोहितनं भारताचा चौथ्या क्रमांकाचा शतकवीर होण्याचा मान पटकावला. त्यानं वीरेंद्र सेहवागला मागे टाकले. 

शतकानंतर 150 धावांची मजल मारण्यासाठी रोहितला अवघे 18 चेंडू लागले. त्याने 44.5 व्या षटकात जबरदस्त षटकारासह दीडशे धावा पूर्ण केल्या. 150 धावांपासून 200 धावांची झेप घेण्यासाठी रोहितला आणखी फक्त 18 चेंडू लागले. त्याने पन्नासाव्या षटकातील तिसऱया चेंडूवर कारकीर्दीतील तिसरे द्विशतक पूर्ण केले. त्यासाठी रोहितला अवघे 151 चेंडू लागले. रोहित 153 चेंडूत 208 धावांसह नाबाद राहिला. कर्णधार असताना आणि कर्णधार नसतानाही रोहित शर्माने द्विशतक झळकाविण्याची कामगिरी केली आहे. 

रोहितचे तिसरे द्विशतक

  • 9 चेंडू पहिली धाव 
  • 65 चेंडू अर्धशतक 
  • 115 चेंडू शतक 
  • 133 चेंडू दीडशे 
  • 151 चेंडू दोनशे 

भारताकडून सर्वाधिक षटकारांचे मानकरी

  • 213 : महेंद्रसिंग धोनी
  • 195 : सचिन तेंडूलकर
  • 190 : सौरभ गांगुली
  • 158 : रोहित शर्मा
  • 155 : युवराज सिंग

वनडेमध्ये दीडशेहून अधिक धावा सर्वाधिकवेळा

  • 5 : रोहित शर्मा
  • 5 : सचिन तेंडूलकर
  • 5 : डेव्हिड वॉर्नर
  • 4 : सनथ जयसूर्या
  • 4 : ख्रिस गेल
  • 4 : हाशिम आमला

कर्णधार म्हणून विराट कोहलीची फलंदाजी

  • 1 ल्या सामन्यात : 2 धावा
  • 2 ऱया सामन्यात : शतक

कर्णधार म्हणून रोहित शर्माची फलंदाजी

  • 1 ल्या सामन्यात : 2 धावा
  • 2 ऱया सामन्यात : द्विशतक

वनडेमधील द्विशतकवीर

  • 264 : रोहित शर्मा
  • 237 : मार्टिन गुप्टील
  • 219 : वीरेंद्र सेहवाग
  • 215 : ख्रिस गेल
  • 209 : रोहित शर्मा
  • 208 : रोहित शर्मा
  • 200 : सचिन तेंडूलकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com