ग्रामीण भागातील गुणवत्तेला संधी मिळावी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016

पुणे - खेळ कुठलाही असो, ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर गुणवत्ता दडलेली आहे. हे स्कूलिंपिक्‍स २०१६ स्पर्धेदरम्यान सुरू असलेल्या मैदानी स्पर्धेतील निकालावरून पुन्हा एकदा सिद्ध झाले. या संदर्भात डेक्कन जिमखान्याचे अनुभवी प्रशिक्षक अभय मळेकर आणि फुरसुंगीच्या न्यू इंग्लिश स्कूलचे महेंद्र बाजारे यांच्याशी संवाद साधला असता, त्यांनी ग्रामीण भागातील नैसर्गिक गुणवत्तेला संधी मिळण्याची खऱ्या अर्थाने गरज असल्याचे मत मांडले.

मळेकर यांनी एक पाऊल पुढे टाकताना ग्रामीण भागातील गुणवत्तेचा येथे उमटलेला ठसा हा शहरी भागातील विद्यार्थ्यांना धोक्‍याचा इशारा (वेक अप कॉल) असल्याचे मान्य केले. ते म्हणाले, ‘‘ग्रामीण भागातील खेळाडू आतापर्यंत क्रॉस कंट्री आणि लांब पल्ल्याच्या शर्यतीत ठसा उमटवत होते. पण, आता सरावाच्या संधी साधून त्यांनी उडी आणि स्प्रिंट प्रकारातही पाय रोवायला सुरवात केली आहे. हा वेकअप कॉलच म्हणावा लागेल.’’

हा मुद्दा धरून बाजारे सर म्हणाले, ‘‘आम्हालाच नाही, तर आता सरावासाठी मैदान हा सर्वांसमोर मोठा प्रश्‍न आहे. आम्ही मिळेल तेथे सराव करून मार्ग काढतो. सध्या ग्लायडिंग सेंटरजवळील जागेत आम्ही सराव करतो. त्यानंतर शनिवार, रविवार दोन दिवस पुण्यात सणस मैदानावर सराव करण्यासाठी येतो.’’

ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांची तुलना करताना मळेकर यांनी खेळाडूंच्या मानसिकतेवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, ‘‘ग्रामीण भागातील मुले कुठेही सरावाची तयारी ठेवतात. या स्पर्धेतही अनवाणी धावणाऱ्या धावपटूंनी यश मिळविले आहे. शहरातील खेळाडूंची मानसिकता बरोबर याविरुद्ध असते. त्यामुळेच त्यांच्या सरावावर मर्यादा येतात.’’

टॅग्स