यंदाचा 'सिंगापूर ओपन' करंडक भारताकडेच! श्रीकांत-साई प्रणित अंतिम फेरीत

वृत्तसंस्था
शनिवार, 15 एप्रिल 2017

नवी दिल्ली: भारतीय बॅडमिंटनमधील 'स्टार' खेळाडू स्पर्धेबाहेर पडलेले असताना नवोदित साई प्रणित आणि श्रीकांत किदम्बी यांनी सिंगापूर ओपन बॅडमिंटन स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. यामुळे यंदा सिंगापूर ओपनमध्ये विजेतेपदासाठी दोन्ही भारतीय खेळाडूच लढणार आहेत. 

नवी दिल्ली: भारतीय बॅडमिंटनमधील 'स्टार' खेळाडू स्पर्धेबाहेर पडलेले असताना नवोदित साई प्रणित आणि श्रीकांत किदम्बी यांनी सिंगापूर ओपन बॅडमिंटन स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. यामुळे यंदा सिंगापूर ओपनमध्ये विजेतेपदासाठी दोन्ही भारतीय खेळाडूच लढणार आहेत. 

साई प्रणितने त्याच्या लौकिकास साजेसा खेळ करत कोरियाच्या ली डॉंग क्‍युनवर सहज मात केली. साई प्रणितने ली डॉंग क्‍युनवर 21-6, 21-8 असा विजय मिळविला. दोन्ही गेममध्ये साईने क्‍युनला प्रतिकाराची संधीही दिली नाही. एखाद्या सुपर सीरिज मालिकेची अंतिम फेरी गाठण्याची ही साईची पहिलीच वेळ आहे. यापूर्वी जानेवारीमध्ये झालेल्या सय्यद मोदी ग्रां.प्री. ची अंतिम फेरी साईने गाठली होती. 

दुसऱ्या उपांत्य फेरीत भारताच्या श्रीकांत किदम्बीने इंडोनेशियाच्या अँथनी सिनिसुका गिंटिंग याच्यावर मात केली. श्रीकांतने 21-13, 21-14 असा विजय मिळविला. या सामन्यात अँथनीने सुरवातीला आघाडी घेतली होती. एकवेळ श्रीकांत 8-10 असा पिछाडीवर पडला होता. त्यानंतर त्याने सलग गुण जिंकत अँथनीवर आघाडी मिळविली. श्रीकांतने पहिला गेम 17 मिनिटांत जिंकला. दुसऱ्या गेममध्ये श्रीकांतने 9-1 अशी आघाडी घेत अँथनीवर दडपण आणले. त्यानंतर सलग चार गुण घेत अँथनीने सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला; पण श्रीकांतने त्याला आघाडी मिळू दिली नाही. 

सिंगापूर ओपनमध्ये अंतिम फेरी गाठलेले दोन्ही खेळाडू एकाच देशाचे असण्याची ही चौथी वेळ आहे. यापूर्वी चीन, इंडोनेशिया आणि डेन्मार्कच्या खेळाडूंनी अशी कामगिरी केली होती. 

Web Title: Sai Praneeth - Shrikanth Kidambi to fight for Singapore Open Badminton tournament