भारताच्या बी. साईप्रणितने जिंकली थायलंड ओपन ग्रांप्री

वृत्तसंस्था
रविवार, 4 जून 2017

साईप्रणित दुसऱ्या सेटमध्ये 9-3 असा आघाडीवर असताना जोनाथन ख्रिस्तीने सलग 6 गुण मिळवत चुरस निर्माण केली, परंतु साईप्रणितने नानाविध शॉट्‌स खेळत मोक्‍याच्या क्षणी गुण मिळवून सेट 21-18 अशा फरकाने जिंकला. तर अंतिम सेट 21-19 अशा फरकाने जिंकला

बॅंकॉक - भारताच्या बी. साईप्रणितने आज (रविवार) चुरशीच्या सामन्यात इंडोनेशियाच्या जोनाथन ख्रिस्तीला तीन सेटमध्ये हरवत थायलंड ओपन ग्रां प्री गोल्ड करंडक बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपद पटकावले. एक तास 11 मिनिटे चाललेल्या या खेळात साईप्रणितने 17-21, 21-18, 21-19 असा विजय मिळवला. 

प्रणितचे हे पहिलेच ग्रांपी विजेतेपद आहे. अत्यंत अटितटीच्या सामन्यात साईप्रणितने पहिला सेट 16-14 अशी आघाडी मिळवूनही गमावल्यानंतर पुढील दोन्ही सेटमध्ये आक्रमक खेळ करत सामन्यात विजय मिळवला. साईप्रणित दुसऱ्या सेटमध्ये 9-3 असा आघाडीवर असताना जोनाथन ख्रिस्तीने सलग 6 गुण मिळवत चुरस निर्माण केली, परंतु साईप्रणितने नानाविध शॉट्‌स खेळत मोक्‍याच्या क्षणी गुण मिळवून सेट 21-18 अशा फरकाने जिंकला. तर अंतिम सेट 21-19 अशा फरकाने जिंकला. 

थायलंड ओपनमध्ये मिळवलेल्या विजयानंतर साईप्रणितने 2017 मधील घोडदौड कायम राखली आहे. एप्रिल महिन्यात झालेल्या सिंगापूर सुपर सीरिजमध्ये साईप्रणितने किदंबी श्रीकांतला हरवून पहिले सुपर सीरिज विजेतेपद पटकावले होते.