साईना भेदू शकते चिनी भिंत - गोपीचंद

वृत्तसंस्था
गुरुवार, 21 जुलै 2016

नवी दिल्ली - ‘साईना नेहवाल सर्वोत्तम फॉर्ममध्ये नसली तरी ती चिनी प्रतिस्पर्ध्यांची भिंत भेदू शकते आणि लंडन ऑलिंपिकपेक्षा सरस कामगिरी करू शकते,’ असा विश्‍वास बॅडमिंटन संघाचे मुख्य प्रशिक्षक पी. गोपीचंद यांनी व्यक्त केला.

 

नवी दिल्ली - ‘साईना नेहवाल सर्वोत्तम फॉर्ममध्ये नसली तरी ती चिनी प्रतिस्पर्ध्यांची भिंत भेदू शकते आणि लंडन ऑलिंपिकपेक्षा सरस कामगिरी करू शकते,’ असा विश्‍वास बॅडमिंटन संघाचे मुख्य प्रशिक्षक पी. गोपीचंद यांनी व्यक्त केला.

 

अर्जुन आणि द्रोणाचार्य अशा दोन्ही पुरस्कारांचे मानकरी असलेले ४२ वर्षांचे गोपीचंद एका कार्यक्रमासाठी येथे आले होते. त्यांनी साईनाच्या ऑस्ट्रेलियन ओपनमधील कामगिरीचा उल्लेख केला. याप्रसंगी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले. ड्रॉविषयी ते म्हणाले की, ‘खेळाडू पदकाच्या निर्धाराने खेळत असेल तर ड्रॉमुळे फरक पडत नाही. दडपणाखाली सलग दोन सामने निर्णायक ठरतील. सुरवातीला किंवा उपांत्यपूर्व फेरीत एखादा सामना खराब ठरू शकतो. त्यामुळे मला ड्रॉची फार चिंता वाटत नाही. तयारी चांगली सुरू असल्याची मला कल्पना आहे.’ ड्रॉ २६ जुलै रोजी जाहीर होईल. सिंधू आणि श्रीकांत यांची यंदाच्या मोसमात चांगली कामगिरी झालेली नाही. याविषयी ते म्हणाले की, ‘ऑलिंपिक पात्रतेच्या भरगच्च वेळापत्रकामुळे हा परिणाम झाला. तुम्हाला खेळातील चुका दुरुस्त करायला वेळच मिळत नाही. पात्रतेसाठी मागील मोसमात कमावलेले गुण राखणे महत्त्वाचे असते. पात्रता गाठल्यानंतर श्रीकांत एकच स्पर्धा खेळला असून त्याने उपांत्य फेरी गाठली आहे. सिंधू कसून सराव करीत आहे. पूर्वी तिने जागतिक, आशियाई अशा स्पर्धांत यश मिळविले आहे. यामुळे मला तिच्याकडून आशा आहेत.’

 

ऑलिंपिकमध्ये काहीही घडल्याचे मी पाहिले आहे. १६ खेळाडूंचा ड्रॉ छोटा असतो. त्यातील २-३ खंडीय प्रतिस्पर्धी असतात. ते फारसे अनुभवी नसतात. त्यामुळे एका फेरीत जरी तुम्ही चांगला खेळ केला तरी पदकाची संधी निर्माण होते. कोणताही खेळाडू कच खाऊ शकतो. त्यामुळे तुम्ही सकारात्मक मनोधैर्य ठेवणे आणि छोट्याशा संधीचा फायदा घेणे महत्त्वाचे असते.

- गोपीचंद, राष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक

Web Title: saina