साईना नेहवालची वाढदिवशी हुतात्मा जवानांना मदत

वृत्तसंस्था
शनिवार, 18 मार्च 2017

बंगळूर - भारतीय बॅडमिंटनची पहिली फुलराणी असलेल्या साईना नेहवालने वाढदिवसाच्या दिवशी सुकमा हल्ल्यात हुतात्मा झालेल्या 12 जवानांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 50 हजारांचे आर्थिक साह्य केले.

तिने आपला हा वाढदिवस बॅडमिंटन कोर्टवर साधेपणानेच साजरा केला. साईना शुक्रवारी 27 वर्षांची झाली. तिने वाढदिवसानिमित्त सुकमा येथील नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात हुतात्मा झालेल्या केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या 12 जवानांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्याचे ठरवले. एकंदर सहा लाख रुपये तिने दिले.

आपण सुरक्षित राहावे म्हणून, जवान आपल्या जीवाची बाजी लावतात. छत्तीसगडमध्ये हुतात्मा झालेल्या जवानांना मी परत आणू शकत नाही; मात्र त्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्याचे अल्पसे काम करू शकते, असे साईनाने सांगितले. भेज्जी आणि इंजेराम या रस्त्याचे काम सुरळीतपणे व्हावे, यासाठी हे जवान तैनात करण्यात आले होते.

साईनाने आपला वाढदिवस सरावाच्या ब्रेकदरम्यान साजरा केला. कोर्टवरच केक कापण्यात आला आणि साईनाने मार्गदर्शक विमलकुमार आणि आईला हा केक भरवला.