ऑलिंपियन साक्षी मलिक विवाहबद्ध

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 एप्रिल 2017

रोहटक - रिओ ऑलिंपिक स्पर्धेत ब्रॉंझपदक विजेती भारताची महिला कुस्तीगीर साक्षी मलिक हिचा विवाह रविवारी कुस्तीगीर सत्यव्रत कडियन याच्याशी पार पडला. या वेळी सुशील कुमार, हरियानाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हुडा यांच्यासह क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. साक्षी आणि सत्यव्रत यांचा गेल्यावर्षी ऑक्‍टोबरमध्ये साखरपुडा संपन्न झाला होता. साक्षी ऑलिंपिकमध्ये पदक मिळविणारी पहिली भारतीय महिला कुस्तीगीर असून, सत्यव्रत याने 2010 युवा ऑलिंपिकमध्ये ब्रॉंझ आणि 2014 राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक मिळविले आहे. वीरेंद्र सेहवाग, विजेंदरसिंग, दीपा कर्माकर, साईना नेहवाल, पॅरा ऑलिंपियन दीपा मलिक यांनी ट्‌विटरवरून साक्षीला शुभेच्छा दिल्या.
Web Title: sakshi malik marriage