भारताच्या पराभवानंतर सानिया मिर्झाचे ट्विट

वृत्तसंस्था
सोमवार, 19 जून 2017

सानिया मिर्झाने ट्विटमधून म्हटले आहे, की भारताचा क्रिकेटमध्ये पराभव झाला असला तरी हॉकीमध्ये पाकिस्तानविरुद्ध जिंकलो आहोत. भारतीय आणि पाकिस्तान दोन्ही विजयी संघांचे अभिनंदन. खेळ सर्वांना समान पातळीवर आणतो.

मुंबई - आयसीसी चँपियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारताचा पराभव केल्यानंतर टेनिसपटू सानिया मिर्झाने ट्विटरवरून आपली प्रतिक्रिया दिली आहे. तिने ट्विटमध्ये म्हटले आहे, की क्रिकेटमध्ये पराभव झाला असला तरी, हॉकीमध्ये आपण जिंकलो आहोत.

अंतिम सामन्यात भारताला पाकिस्तानकडून 180 धावांनी दारुण पराभव स्वीकारावा लागला. पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंनी सरस खेळाचे प्रदर्शन करत चँपियन्स करंडकावर आपले नाव कोरले. पाकिस्तानच्या विजयी संघात सानिया मिर्झाचा पती शोएब मलिकचाही समावेश होता. त्यामुळे सानिया मिर्झाच्या प्रतिक्रियेकडे सर्वांचे लक्ष होते. तिने पाकिस्तान संघाचे अभिनंदन करताना भारतीय संघानेही हॉकीत विजय मिळविल्याचे म्हटले आहे. 