सानिया मिर्झा आई होणार

वृत्तसंस्था
मंगळवार, 24 एप्रिल 2018

नवी दिल्ली - भारतीय टेनिस तारका सानिया मिर्झा टेनिसपासून दूर असल्याचे कारण आता समोर आले आहे. सानिया मिर्झा गोड बातमी देणार असल्याचे पती शोएब मलिक याने ट्‌विट केले आहे. ऑक्‍टोबर २०१७ पासून गुडघ्याच्या दुखापतीने सानिया टेनिसपासून दूर आहे. मलिक पाठोपाठ सनियानेदेखील आपले एक छायाचित्र ट्‌विट करून आपण आई होणार असल्याचे सांगितले. सानियाचे वडील आणि प्रशिक्षक इम्रान यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला असून, ऑक्‍टोबरमध्ये गोड बातमी मिळेल असे सांगितले आहे. सानियाने यापूर्वीच आपला मुलगा किंवा मुलगी ‘मिर्झा-मलिक’ असे आडनाव लावेल असे स्पष्ट केले होते. 

Web Title: Sania Mirza giving good news