सौदी अरेबियाच्या संघात चार महिला खेळाडू

वृत्तसंस्था
शुक्रवार, 5 ऑगस्ट 2016

रियाध - सौदी ऑलिंपिक समितीने आपल्या चार महिला खेळाडूंना ऑलिंपिकमध्ये सहभागी होण्याची परवानगी दिली आहे. सौदी ऑलिंपिक समितीच्या प्रवकत्याने सोमवारी ही माहिती दिली. 

रियाध - सौदी ऑलिंपिक समितीने आपल्या चार महिला खेळाडूंना ऑलिंपिकमध्ये सहभागी होण्याची परवानगी दिली आहे. सौदी ऑलिंपिक समितीच्या प्रवकत्याने सोमवारी ही माहिती दिली. 

सारा अल अत्तार, लुब्ना अल ओमेर, कॅरीमन अबू अल जदेल आणि वुजुद फाहमी या चार महिला रिओ ऑलिंपिकमध्ये सौदी अरेबियाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. पुरुष संस्कृतीची वरचष्मा असणाऱ्या सौदीमध्ये महिलांना उघडपणे फिरतादेखील येत नाही. अशा स्थितीत सौदी ऑलिंपिक समितीने महिलांना ऑलिंपिकला पाठविण्याचा घेतलेला निर्णय ऐतिहासिक मानला जात आहे. सौदी अरेबियाच्या अधिकृत संघाची घोषणा करण्यात आली असून, यामध्ये केवळ सात पुरुष खेळाडूंचा समावेश आहे. सौदी ऑलिंपिक समितीने पुरुष आणि महिला संघाची स्वतंत्रपणे घोषणा केली. सौदीच्या संघातील चारही महिला खेळाडूंना वाईल्ड कार्ड प्रवेश देण्यात आला आहे. त्यांना कुठल्याही पात्रता निकषाची गरज भासणार नाही. 

साराचे दुसरे ऑलिंपिक

सौदी अरेबियाकडून सर्वप्रथम २०१२ ऑलिंपिक स्पर्धेत दोन महिला धावपटूंचा संघात समावेश करण्यात आला होता. यातील सारा अत्तार हिचे दुसरे ऑलिंपिक असून, ती ८०० मीटर धावण्याच्या शर्यतीत सहभागी होईल. तिच्याबरोबरच अबू जदेल ही १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत सहभागी होईल. ओमर ही तलवारबाजी, तर फाहमी ही ज्युदो (५२ किलो) खेळाडू आहे. शिका किंवा लग्न करा अशी येथील महिलांची स्थिती असते. अशा कठिण परिस्थितीत या महिला धर्मानुसार हिजाब घालूनच मैदानावर उतरतात. तशाच प्रकारचा त्यांचा क्रीडा पोषाख बनवलेला असतो.