आवारेच्या सहभागासाठी निवड चाचणी लांबणीवर?

वृत्तसंस्था
बुधवार, 13 जून 2018

नवी दिल्ली - आशियाई क्रीडा कुस्ती स्पर्धेच्या 57 किलो वजनी गटातील निवडीबाबत डाव-प्रतिडाव सुरूच आहेत. आता राष्ट्रकुल क्रीडा सुवर्णपदक विजेत्या राहुल आवारेच्या सहभागासाठी ही बुधवारी होणारी चाचणी लांबणीवर टाकण्याचा विचार सुरू असल्याचे समजते. 

भारतीय संघाच्या 9 जूनला झालेल्या निवड चाचणीत आवारे सहभागी झाला नव्हता. त्याने वजनही दिले नव्हते. या चाचणीनंतर संदीप तोमर, उत्कर्ष काळे आणि रवी यांचे समान गुण झाले होते. लढतीतील गुणफलकावर संदीप अव्वल ठरला होता; पण बुधवारी होणारी ही चाचणी आता लांबणीवर पडण्याचे संकेत मिळत आहेत. 

भारतीय कुस्ती महासंघाने आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने प्रभावी कामगिरी केलेल्या सुशील कुमार, बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि विनेश फोगटला चाचणीतून सूट दिली. आवारेची चाचणीतून सूट देण्याची मागणी फेटाळण्यात आली होती; पण आवारे चाचणीत सहभागी झाला नाही. चाचणीबाबत खूप उशिरा कळले. त्यामुळे वजन कमी करण्यास वेळ मिळाला नाही, असा दावा आवारेने केला होता. 

आवारेने भारतीय कुस्ती महासंघाचे प्रमुख ब्रिजभूषण शरणसिंग यांची भेट घेतली आणि त्यांना निवड चाचणीत सहभागाची संधी देण्याची मागणी केली. आवारे तसेच संदीप तोमरने चाचणीच्या पूर्वतयारीसाठी पुरेसा वेळ हवा असल्याचे सांगितले. त्यामुळे ही चाचणी पुढे ढकलण्याची तयारी अध्यक्षांनी दर्शवली; पण त्याचवेळी त्यांनी महासंघाच्या कार्यकारिणीची मंजुरी आवश्‍यक असल्याचे सांगितले होते. अध्यक्षांना सहसा विरोध होत नाही, त्यामुळे चाचणी लांबणीवरच पडेल, असे सांगितले जात आहे. 

Web Title: Selection test delayed due to rahul aware