जेव्हा सेरेना भडकते...

Serena Williams argues with umpire Carlos Ramos during her Women’s singles finals match against
Serena Williams argues with umpire Carlos Ramos during her Women’s singles finals match against

न्यूयॉर्क- यंदाच्या अमेरिकन टेनिस स्पर्धेत टेनिस विश्‍वाला नाओमी ओसाका ही नवी टेनिसची राणी मिळाली. मात्र, लक्षात राहिली ती सेरेना विल्यम्स. कोर्टवरील आपल्या बेदरकार वागण्याने सेरेना चर्चेचा विषय ठरली.

रागाच्या भरात काही वर्षांपूर्वी लाइनमनला अर्वाच्य भाषेत फैलावर घेणाऱ्या सेरेनाने या वेळी थेट चेअर पंचांलाचा (प्रमुख पंच) आपले पाणी दाखवले. रागाच्या भरात तिने पंचांना थेट "तू चोर आहेस' असे सुनावले.

महिला एकेरीच्या अंतिम लढतीदरम्यान दुसऱ्या सेटमध्ये सेरेना बॉक्‍समध्ये बसलेल्या प्रशिक्षकाशी खाणाखुणा करताना आढळून येत होती. त्या वेळी प्रथम पंचांनी तिला इशारा दिला. त्यानंतर पुन्हा एकदा फाऊल झाल्यावर तिने प्रशिक्षकाशी खाणाखुणा केल्या. या वेळी मात्र पंचांनी इशारा देताना तिला एक गुणाचा दंडही केला. तेव्हा सेरेना भडकली आणि तिने थेट पंचांना "तुम्ही चोर आहात, माझी माफी माग. कधी मागणार ते सांगा. तुम्ही माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत आहात. तुम्ही पुन्हा माझ्या लढतीसाठी येऊ शकणार नाहीत,' अशी धमकीच दिली.

कोर्टवरील नियमाचे उल्लंघन केल्यामुळे पंच रामोर यांनी सेरेनाला थेट एका गेमचा दंड केला. कोर्टवर अपशब्द वापरल्याने तिच्यावर ही तिसरी कारवाई करण्यात आली. 

मी काहीच केले नाही... 
लढतीनंतर पत्रकारांशी बोलताना सेरेनाने आपल्या वर्तनाचे समर्थन केले. ती म्हणाली, ""मी काहीच चुकीचे वागले नाही. टेनिस माझा श्‍वास आणि पहिले प्रेम आहे. मी कसे वागावे, हे ऐकून घेण्यासाठी मी खेळत नाही. मी प्रशिक्षकाशी कसल्याही खाणाखुणा केल्या नाहीत.'' 

मी महिला खेळाडूंच्या हक्कासाठीच भांडले. कोर्टवर नेहमीच महिला टेनिसपटूंना वेगळी वागणूक मिळत असते. मी केवळ त्याच्याविरुद्धच आवाज उठवला. - सेरेना विल्यम्स 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com