'बूम बूम' आफ्रिदीचे अवघ्या 42 चेंडूंत शतक!

वृत्तसंस्था
बुधवार, 23 ऑगस्ट 2017

आफ्रिदी आणि जेम्स व्हिन्स याने 36 चेंडूंत झळकाविलेल्या आक्रमक अर्धशतकाच्या जोरावर प्रथम फलंदाजी करताना हॅम्पशायरने 250 धावांचे सशक्त आव्हान उभे केले. या आव्हानाचा सामना करताना डर्बीचा डाव अवघ्या 148 धावांत संपुष्टात आला

लंडन - इंग्लंडमधील ट्‌वेंटी ट्‌वेंटी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यामध्ये पाकिस्तानचा अष्टपैलु खेळाडू शाहिद आफ्रिदी याने अवघ्या 42 चेंडूंत तडकाविलेल्या शतकी खेळीच्या जोरावर हॅम्पशायर क्‍लबने डर्बीशायरला 101 धावांनी पराभूत केले.आफ्रिदीचे हे ट्‌वेंटी ट्‌वेंटी प्रकारातील पहिलेच शतक होते. आफ्रिदीच्या शतकी खेळीमध्ये सात गगनचुंबी षटकारांचा समावेश होता.

आफ्रिदी आणि जेम्स व्हिन्स याने 36 चेंडूंत झळकाविलेल्या आक्रमक अर्धशतकाच्या जोरावर प्रथम फलंदाजी करताना हॅम्पशायरने 250 धावांचे सशक्त आव्हान उभे केले. या आव्हानाचा सामना करताना डर्बीचा डाव अवघ्या 148 धावांत संपुष्टात आला. खराब फॉर्मशी झगडत असलेल्या आफ्रिदीसाठी ही संस्मरणीय खेळी अत्यंत दिलासादायक असल्याचे मानले जात आहे.