हा न्यायालयाचा खेळ नव्हे

Ajay Shirke and Anurag Thakur
Ajay Shirke and Anurag Thakur

खेळांमध्ये मोठी बाजारपेठ आहे, ही बाब समोर आल्यानंतर याच मार्केटच्या शक्तीने भारतीय खेळांना आता नवी ताकद प्रदान केली असून, विविध खेळांच्या विकासासाठीची दारे उघडली आहेत. न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून भारतीय क्रिकेट नियामक मंडळातील चुकीच्या गोष्टींवर जे घाव घातले जात आहेत, मात्र त्यामुळे बोर्ड आणखी घायाळ होत आहे.

बंगळूरला जाण्यासाठी मागील गुरुवारी मी विमानतळावर दाखल झाले, तर नेहमीप्रमाणे विमानाच्या उड्डाणाला दोन तासांचा उशीर होणार असल्याचे समजले. खेळांचा चाहता असल्यामुळे ही बाब मी खिलाडूपणे घेतली. त्या वेळी भारतीय खेळांबाबत विचार करत होतो. क्रिकेट किंवा भारतीय क्रिकेट नियामक मंडळातील उच्चपदस्थांवर लोढा समितीने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकबाबत मी विचार करत नव्हतो, तर कुस्तीबाबतचा विचार माझ्या मनात आला.

दंगलमधील फिल्मी कुस्तीचा नव्हे, तर खऱ्या खुऱ्या कुस्ती खेळाबाबत मी विचार करत होतो. सोफिया मॅटसनकडून बबिता फोगटचा झालेला पराजय मी नुकताच पाहिला आहे. सोफियाने अवघ्या 46 सेकंदांत बबिताचा पराभव केला होता. त्यानंतर निर्मलादेवीने कॅरालिना कॅस्टिलो हिडाल्गोचा पराभव केला होता. या कुस्तीनंतर मॅटवर ओळखीचा चेहरा दाखल झाला. तो होता अझरबैजानचा टोगरुल असगारॉव, जो काही काळ जगातील सर्वोत्तम मल्लांपैकी एक होता. त्याने लंडन ऑलिंपिकमध्ये 60 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले होते, तर रिओ मध्ये 65 किलो वजनी गटात रजत पदक पटकावले होते. त्याला आव्हान देण्यासाठी दाखल झाला तो फारसा कोणालाही परिचित नसलेला भारताचा विकास कुमार. पहिल्या फेरीत असगारॉवने बाजी मारली. मात्र, दुसऱ्या फेरीत दंगलमधील महावीर फोगट यांच्याप्रमाणे आक्रमक खेळ करत विकास कुमारने दुसरी फेरी जिंकली. तिसरी फेरी जिंकून असगारॉवने विकासकुमारचा पराभव केला. पराजय झाला असला तरी भारताच्या नवख्या खेळाडूने जगातील सर्वोत्तम कुस्त्तीपटूशी आक्रमकपणे दिलेली झुंज लक्षात राहिली.

भारताच्या ताज्या प्रो-कुस्ती लीगला मोठ्या प्रमाणात आर्थिक पाठबळ मिळाले होते. तसेच अनेक मोठ्या नावांचे पाठबळही लाभले. आयपीएलप्रमाणेच कुस्ती लीगमधील शहर आणि राज्यांच्या संघांची मालकी मोठ्या उद्योगपतींकडे आहे. बक्षिसापोटी आणि खेळाडूंना मिळणाऱ्या मोठ्या किमतीमुळे जगातील अनेक चांगले कुस्तीपटू या कुस्ती लीगकडे आकर्षित होत आहेत. या लीगमध्ये सहभागी झालेल्या असगारॉव हा एनसीआर पंजाब रॉयल्स संघाकडून खेळत होता, तर त्याच्या विरोधात खेळणारा कुस्तीपटू हा मुंबई महारथी संघाचा होता. या कुस्ती लीगमुळे आता भारतीयांना खऱ्या आर्थाने जागतिक दर्जाची कुस्ती पाहण्याची संधी मिळाली आहे. कुस्ती लीगमुळे आता भारतीय कुस्तीला चांगले दिवस आले असून, कुस्तीपटूंना फक्त मानसन्मानच नव्हे, तर चांगला पैसाही मिळू लागला आहे. भारतीय कुस्तीला एकप्रकारे "अच्छे दिन' आले आहेत.

कुस्ती पाहून कंटाळा आला असले तर हातातील रिमोट वापरून दुसऱ्या वाहिनीवर सुरू असलेली बॅडमिंटन लीग पाहण्याचा पर्याय उपलब्ध होता. तिथे भारताचा स्टार खेळाडू के. श्रीकांत आणि जगातीक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या डेन्मार्कच्या जोर्गेंसेन यांच्यात सामना होता. श्रीकांत हा जागतिक क्रमवारीत 15व्या स्थानी असूनही त्याने ही लढत जिंकली हे विशेष. ही लढत पाहण्यासाठी लखनौमधील स्टेडियम तुडुंब भरले होते. श्रीकांत आणि जोर्गेंसेन हे अनुक्रमे अवध वॉरिअर्स आणि दिल्ली एसर्स संघाचे खेळाडू आहेत. या लीगमध्ये जगभरातील चांगले बॅडमिंटनपटू उभरत्या भारतीय खेळाडूंशी लढत देत आहेत.

या वेळी स्टेडियममधील पहिल्या रांगेत अखिलेश दास हे राजकीय नेते बसलेले दिसून आले. ते भारतीय बॅडमिंटन संघटनेचे (बीएआय) प्रमुख आहेत आणि बॅडमिंटन लीगचा कारभार समर्थपणे सांभाळत आहेत. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिवंगत बनारसी दास यांचे अखिलेश हे चिरंजीव. यूपीए-1च्या काळात मंत्रिपद सांभाळलेले अखिलेश दास हे सध्या बसपचे नेते आहेत. त्यांच्या कार्यकाळात भारतीय बॅडमिंटन संघटनेत अनेक वादग्रस्त गोष्टी घडल्या, नाही असे नाही. मात्र, बॅडमिंटन संघटनेने प्रगती केली हे नक्की.

भारतीय कुस्ती महासंघाचे प्रमुख पाच वेळा खासदार राहिलेले ब्रिजभूषण शरण सिंह हेही प्रचंड वादग्रस्त व्यक्तिमत्त्व आहे. ते तुरुंगातही गेलेले आहेत. तसेच, त्यांना टाडाअंतर्गत अटकही झाली होती. कुस्तीमध्ये फार मोठी कामगिरी बजावलेली नाही. भारतीय कुस्ती महासंघाला काही काळासाठी बीसीसीआयच्या जागी ठेवले तर ब्रिजभूषण काय किंवा बॅडमिंटन संघटनेचे अखिलेश काय, दोघेही लोढा समितीची चाचणी उत्तीर्ण होऊ शकत नाहीत. मात्र, त्याच वेळी हे ही ध्यानात असायला हवे की, या दोघांच्या नेतृत्वाखाली या दोन्ही खेळांनी आजवरची सर्वोत्तम कामगिरी केली आहे.

ज्या खेळात देशाने प्रगती केली आहे, अशा इतरही खेळांवर आपण नजर टाकू. 2007 ते 2012 या काळात अभय चौटाला यांच्या नेतृत्वाखाली भारतीय मुष्टियोद्‌ध्यांनी चांगली कामगिरी बजावली होती. याच चौटाला यांना भारतीय ऑलिंपिक संघटनेने दिलेले आजीवन अध्यक्षपद वादग्रस्त ठरले होते. हरियानातील कॉंग्रेसचे भूपेंदरसिंग हुडा यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार आणि चौटाला यांनी एकत्र येत हरियानाला मुष्टियुद्धात आघाडीवर पोचविले. एवढेच नव्हे, तर हरियानाला खेळांची राजधानी बनविले. हरियानातील खेळाडू विजेंद्रसिंग हे त्याचे उत्तम उदाहरण होय. चौटालांच्या नंतर मात्र मुष्टियुद्धात देश पिछाडीवर गेला. स्पाइसजेटचे मालक आणि दिवंगत प्रमोद महाजन यांचे मित्र असलेले अजय सिंग हे सध्या मुष्टियोद्धांच्या संघटनेचे नेतृत्व करत आहेत. कबड्डीसारख्या अनेक खेळांमध्ये देशात आता आंतरराष्ट्रीय लीग सुरू झाल्या आहेत. काही जागतिक करंडक स्पर्धाही झाल्या. जनार्दनसिंह गेहलोत यांनी कबड्डी संघटनेचे नेतृत्व केले. ती जबाबदारी त्यांनी आपल्या पत्नी डॉ. मृदुला भादुरिया यांच्याकडे सोपवली असून, त्यांचेही काम चांगले आहे.

या पैकी कोणीही वय, व्यवसाय किंवा कार्यकाळाबाबतची लोढा समितीची चाचणी परीक्षा उत्तीर्ण होऊ शकत नाही, हे उघड सत्य आहे. ऍथलेटिक्‍स संघटनेचे नेतृत्व आदिल सुमारीवाला यांच्याकडे आहे. त्यांनी मॉस्को ऑलिंपिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. मात्र, स्वतः खेळाडू असलेल्या सुमारीवाला यांच्या नेतृत्वाखाली ऍथलेटिक्‍स संघटनेत राडाच अधिक झाला, तर दुसरीकडे हॉकी लीगचे जगभरातील चांगल्या खेळाडूंना आकर्षण वाटू लागले आहे. क्रिकेटमधील टी-20 प्रमाणे येणारा हॉकीचा अवतार मोठ्या प्रमाणात पैसा आकर्षित करणार हे निश्‍चित.

वर उल्लेख केलेल्या माहितीवरून आपण काही निष्कर्ष काढू शकतो का(?) वय, राजकारण, संपत्ती, खेळातील विक्रम किंवा यातील काहीही नसणे हे खेळात यशाची खात्री देऊ शकत नाही, हे निश्‍चित. त्यामुळे तुम्ही क्रिकेटसारख्या खेळाबाबत निकष कसे ठरविणार. क्रिकेटमध्ये आपण आर्थिक महासत्ता उभी केली आहे, हे विसरून चालणार नाही.

बीसीसीआयमध्ये पारदर्शकतेला स्थान राहिले नाही, भ्रष्टाचार आणि उद्धटपणा वाढला आहे. अनेक वाद-विवाद आहेत. अनेक लहान-मोठे प्रश्न आहेत. या सर्व गोष्टींचा सामना सर्वोच्च न्यायालयाचे तीन प्रामाणिक आणि निवृत्त न्यायाधीश कशा प्रकारे करणार(?)
लोढा समितीच्या अहवालाच्या आधारे बीसीसीआयसारख्या मोठ्या संघटनेची शस्त्रक्रिया होऊ घातली आहे. शस्त्रक्रियेसाठी रुग्णाचे पोट फाडल्यानंतर टाके न घालता ते तसेच उघडे ठेवणे अतिशय धोकादायक ठरू शकते. त्यामुळे लोढा समितीचा अहवाल सरकारकडे सुपूर्त करून सरकारलाच पावले उचलण्यास लावले असते तर ते एक वेळ योग्य ठरले असते. त्यामुळे बीसीसीआयसारख्या संघटनेतील सध्याच्या उच्च पदस्थांच्या जागेवर निवृत्त न्यायाधीशांची नेमणूक केल्याने सर्व प्रश्न सुटू शकतील असे नाही.

निवृत्त न्यायमूर्ती आपली जबाबदारी चोख पार पाडतील. मात्र, आधुनिक खेळातील अनेक खाचा खोचा त्यांच्याकडून सुटण्याची शक्‍यताच अधिक आहे. खेळांमध्ये आता खेळाबरोबरच ग्लॅमर, रोषणाई, चिअरलीडर्स, आकर्षक कपडे परिधान केलेल्या टीव्हीवरील सूत्रसंचालिका अशा अनेक गोष्टी आल्या आहेत. क्रिकेटसारख्या सभ्य नागरिकांच्या खेळातही अशा अनेक गोष्टी आल्या आहेत. विविध खेळांमध्ये आता खेळाबरोबरच पैसा आणि खूप सारा तमाशाही आला आहे. त्यामुळे लोढा समितीच्या शिफारसींद्वारे नियुक्त केलेले निवृत्त न्यायाधीश हे आव्हान कसे पेलणार, हा प्रश्न उरतोच. लोढा समितीच्या सन्माननीय सदस्यांनी जेरी मॅग्वायर हा सिनेमा पाहिला आहे का नाही, याबाबत माझ्या मनात शंका आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com