सिंधूला चहा देण्यासाठी चाहत्यांत चढाओढ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 नोव्हेंबर 2016

मुंबई -  हाँगकाँग बॅडमिंटन स्पर्धेत ऑलिंपिक रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधू स्टार असणार हे दिसू लागले आहे. तिला ‘चहा देण्यासाठी’ चाहत्यांत चढाओढ सुरू आहे. 

मुंबई -  हाँगकाँग बॅडमिंटन स्पर्धेत ऑलिंपिक रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधू स्टार असणार हे दिसू लागले आहे. तिला ‘चहा देण्यासाठी’ चाहत्यांत चढाओढ सुरू आहे. 

हाँगकाँग सुपर सीरिजच्या मुख्य लढतींना उद्या (ता. २३) सुरवात होईल. संयोजकांनी त्यापूर्वीच वातावरणाची निर्मिती करण्यासाठी स्पर्धा संकुल परिसरात हाँगकाँगची वैशिष्ट्ये दाखवणारी चार मोठी थ्री डी पेंटिंग्ज लावली आहेत. या चित्रांसोबत सेल्फी घेण्यासाठी किंवा फोटो काढण्यासाठी काहीही शुल्क नाही किंवा स्पर्धेचे तिकीटही काढावे लागत नाही. ही चित्रे तयार करताना अर्थातच चाहत्यांमध्ये लोकप्रिय असलेल्या ली चाँग वेई, कॅरोलिना मरिन, व्हिक्‍टर ॲक्‍सेलसेन, पी. व्ही. सिंधू यांच्याबरोबरच हाँगकाँगचे खेळाडू आहेत. 
एकंदरीत १८ मीटर लांब असलेल्या या चार चित्रांत सिंधू असलेले चित्र सर्वाधिक लोकप्रिय ठरत आहे. या चित्राशेजारी उभे राहून आपण सिंधूला चहा देत आहोत, असा ‘फिल’ देता येतो. लि चाँग वेई किंवा कॅरोलिन मरिन यांच्याविरुद्ध खेळत असल्याचा भास निर्माण करण्याची संधीही साधली जात आहे. पण, सिंधूला ‘चहा देण्याची’ संधी मोठ्या प्रमाणावर चाहते साधत होते, असे स्पर्धा संकेतस्थळावर नमूद करण्यात आले आहे. 

Web Title: Sindhu fans of competition to tea