सिंधू, साईना पहिल्याच फेरीतून बाहेर

वृत्तसंस्था
बुधवार, 5 एप्रिल 2017

इंडियन ओपन स्पर्धेत आपल्या खेळाने सर्वांना प्रभावित करणाऱ्या सिंधूला 13 व्या मानांकित चेन युफेईकडून 21-18, 19-21, 17-21 असा पराभव स्वीकारावा लागला.

क्वालालंपूर - इंडियन ओपन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद मिळविणारी भारताची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिच्यासह फुलराणी साईना नेहवालला मलेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत पहिल्या फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

इंडियन ओपन स्पर्धेत आपल्या खेळाने सर्वांना प्रभावित करणाऱ्या सिंधूला 13 व्या मानांकित चेन युफेईकडून 21-18, 19-21, 17-21 असा पराभव स्वीकारावा लागला. या वर्षांत सिंधून खेळलेल्या 14 सामन्यांपैकी दुसऱ्यांदा तिला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. सिंधूने रिओ ऑलिंपिकमध्ये रौप्यपदक पटकाविले होते.

दुसरीकडे दुखापतीमुळे सतत कोर्टबाहेर असलेल्या साईना नेहवालचाही पहिल्याच फेरीत पराभव झाला. साईनाचे जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या अकाने यामागुची हिने 21-19, 13-21, 15-21 असा पराभव केला. साईनाने इंडियन ओपन स्पर्धेत सिंधूने पराभूत केले होते.