आफ्रिकेची मालिकेतही बाजी

होबार्ट - काईल ऍबॉट विकेटनंतर जल्लोष करताना.
होबार्ट - काईल ऍबॉट विकेटनंतर जल्लोष करताना.

पावसामुळे एक दिवस वाया जाऊनही कांगारूंवर नामुष्की

होबार्ट - दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियाला डावाने गारद केले. याबरोबरच आफ्रिकेने तीन कसोटींच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. आफ्रिकेने एक डाव आणि ८० धावांनी जोरदार विजय खेचून आणला. पावसामुळे दुसऱ्या दिवशी पूर्ण खेळ वाया जाऊनही कांगारूंना डावाच्या पराभवाची नामुष्कीही टाळता आली नाही. २००८ आणि २०१२ नंतर ऑस्ट्रेलियाला मायदेशात आफ्रिकेविरुद्ध सलग तिसऱ्यांदा पराभूत व्हावे लागले.

डावाचा पराभव टाळण्यासाठी ऑस्ट्रेलियाला २४० धावांची गरज होती. २ बाद १२१ अशी समाधानकारक मजल त्यांनी मारली होती, पण चौथ्या दिवशी उपाहारापूर्वीच खेळ खल्लास झाला. त्यांचा डाव १६१ धावांत आटोपला. आफ्रिकेने पर्थमधील सलामीची कसोटी १७७ धावांनी जिंकली होती. आता तिसरी कसोटी ॲडलेडला प्रकाशझोतात होईल,

काल ख्वाजा (५६) व स्मिथ (१८) नाबाद होते. या डावातही काईल ॲबॉट सर्वाधिक यशस्वी ठरला. त्याने सकाळच्या सत्रात चार मोहरे गारद केले. त्याने सहा, तर रबाडाने चार विकेट घेतल्या.

ॲबॉटने काल बर्न्स-वॉर्नर या सलामीवीरांना बाद केले होते. आज त्याने ख्वाजाला बाद केले. स्वैर चेंडूला डिवचण्याची चूक ख्वाजाला भोवली. तो यष्टीमागे झेल देऊन परतला. ऑस्ट्रेलियाचे पहिले चार फलंदाज यष्टीमागे झेल देऊन परतले. स्मिथ-ख्वाजा यांनी ५० धावांची भागीदारी रचली.

पहिल्या डावात शून्यावर बाद झालेला व्होजेस या वेळी केवळ दोन धावा करू शकला. ॲबॉटच्या चेंडूवर तो पूलचा बेजबाबदार फटका मारून परतला. रबाडाने फर्ग्युसन, नेव्हील व मेनी यांना गारद केले. स्मिथचा अडथळा त्यानेच दूर केला. स्मिथ बाद झालेला आठवा फलंदाज ठरला. ॲबॉटने मग उरलेले दोन फलंदाज बाद केले. ‘सामनावीर’ पुरस्कार त्यानेच पटकावला.
 

धावफलक
ऑस्ट्रेलिया - पहिला डाव - ८५ दक्षिण आफ्रिका - ३२६
ऑस्ट्रेलिया - दुसरा डाव - ज्यो बर्न्स झे. डीकॉक गो. ॲबॉट ०, डेव्हिड वॉर्नर त्रि. गो. ॲबॉट ४५-७८ चेंडू, ४ चौकार, उस्मान ख्वाजा झे. डीकॉक गो. ॲबॉट ६४-१२१ चेंडू, ९ चौकार, स्टीव स्मिथ झे. डीकॉक गो. रबाडा ३१, ॲडम व्होजेस झे. ड्युमिनी गो. ॲबॉट २, कॅलम फर्ग्युसन झे. एल्गर गो. रबाडा १, पीटर नेव्हील झे. ड्युमिनी गो. रबाडा ६, ज्यो मेनी पायचीत गो. रबाडा ०, मिशेल स्टार्क झे. डीकॉक गो. ॲबॉट ०, जॉश हेझलवूड नाबाद ६, नेथन लायन झे. फिलॅंडर गो. ॲबॉट ४, अवांतर २, एकूण ६०.१ षटकांत सर्वबाद १६१
बाद क्रम - १-०, २-७९, ३-१२९, ४-१३५, ५-१४०, ६-१५०, ७-१५०, ८-१५१, ९-१५१.
गोलंदाजी - काईल ॲबॉट २३.१-३-७७-६, व्हरनॉन फिलॅंडर १६-६-३१-०, जेपी ड्यूमिनी १-०-८-०, कागिसो रबाडा १७-५-३४-४, केशव महाराज ३-०-१०-०

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com